मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाविरोधात, काँग्रेस व शिंदेगटाची शहर विकास आघाडी स्थापन

SHARE:

ठाणे – मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाविरोधात, काँग्रेस व शिंदेगटाने शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. ठाण्यातील मीरा-भाईंदरमध्ये सत्ताधारी भाजपा विरोधात काँग्रेस व शिंदेगटाने विरोधी आघाडी तयार केली आहे. तर काँग्रेस-शिवसेना शिंदें गटाने शहर विकास आघाडी स्थापन करून भाजपाला परत मोठा धक्का दिला आहे. ठाण्यातील मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ता भाजपकडे असली, तरी शिवसेना आणि काँग्रेसच्या शहर विकास आघाडीमुळे , राजकीय संघर्ष अधिक वाढणार आहे, हे आता दिसत आहे.

ठाण्यातील मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये, भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत, सत्ता काबीज केली असली, तरी विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे , महापालिकेतील राजकारण तापले आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाविरोधात, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्या नगरसेवकांनी, एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केल्याची माहिती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या घडामोडीमुळे ठाण्यामध्ये मीरा-भाईंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेते, पदाचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये भाजपकडे सत्ता आली आहे, परंतु राज्यातील विरोधकही आता एकत्र आले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिकेत एकूण, ९५ निवडून आलेले नगरसेवक असून, नियमानुसार आणखी ५  स्वीकृत नगरसेवक नियुक्त होणार आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपकडे तब्बल ७८ नगरसेवक असल्याने सत्ता पूर्णपणे, भाजपाच्या हातात आहे. मात्र, विरोधी बाजूला काँग्रेसचे १३ , शिवसेना शिंदे गटाचे ३  आणि १  अपक्ष नगरसेवक, असे एकूण १७ नगरसेवक आहेत. यापैकी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने, मोठा विरोधी गट भाजपाच्या विरोधात उभा राहिला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेस-शिवसेना शिंदे गट यांनी, विरोधी पक्षनेतेपदाचा कायदेशीर दावा केला आहे. तर राज्यातील महानगरपालिका नियमांनुसार, सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्ष किंवा आघाडीला, विरोधी पक्षनेते पदाचा अधिकार मिळतो. त्या अनुषंगाने काँग्रेस-शिवसेना शिंदे गट यांनी स्थापन केलेली, शहर विकास आघाडी ही सध्या, ठाण्यातील मीरा-भाईंदर महापालिकेतील सर्वात मोठी, विरोधी आघाडी ठरत आहे.

त्यामुळे या आघाडीला विरोधी पक्षनेते पद, तसेच स्थायी समितीतील सदस्यपद आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा, हक्क मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात गटनोंदणी व गटनेतेपदाबाबत, चर्चा चालू आहे. तर लवकरच मीरा-भाईंदरमध्ये महापालिका, आयुक्तांकडे अधिकृत नोंद केली जाणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेत्याची महापालिकेत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या आघाडीमुळे मीरा-भाईंदरमध्ये महापालिका सभागृहात भाजपाच्या निर्णयांना, संघटित आणि आक्रमक विरोध पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा