मुंबई – राज्यातील लाडकी बहीण लाभार्थी महिलांसाठी, हेल्पलाईन सेवा सुरू होणार आहे, असे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात, मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिण योजनेच्या शंकांचे निरसन करण्यासाठी, प्रश्नांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येणार आह असे म्हटले आहे. आवश्यकता असल्यास या हेल्पलाईनमूळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अडचणी दुर होणार आहेत, असे महिला व बालविकास विभागाने सांगतिले आहे.
लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असताना, काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही, तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या आणि योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी, १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकां १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाभार्थी महिलांना आवश्यकता भासल्यास, या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. काही कारणास्तव केवायसी करताना, चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या नियमानुसार या लाभार्थी महिलांची, क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.




