सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, सत्ताधारी भाजपाविरोधात ४ पक्षांची महाआघाडी स्थापन

SHARE:

बार्शी – सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, सत्ताधारी भाजपाविरोधात 4 पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे. सोलापूरात ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आली आहे, तर अजितदादा-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एकत्र आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपाविरोधात ४  पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे. सोलापुरातील बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीने , सत्ताधारी भाजपाविरोधात महाआघाडी स्थापन केली आहे.

राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, याची प्रचिती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात, पुन्हा एकदा आली आहे. राज्यभरात एकमेकांविरोधात उभ्या असलेल्या, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट हे, बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजपाविरोधात या ४  पक्षांनी मिळून एक महाआघाडी स्थापन केल्याने, सोलापूरच्या राजकारणात नवीन बदल झाला आहे.

या महाआघाडीची अधिकृत घोषणा, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी, सोशल मीडियावर केली आहे. त्यांनी बार्शीत होत असलेल्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे, आवाहन कार्यकर्ते आणि नागरिकांना केले आहे. बार्शी तालुक्यातील राजकारण हे, नेहमीच आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन प्रमुख नेत्यांभोवती फिरत आले आहे. पक्ष कोणताही असो, निवडणुक लढाई ही दोन गटांमध्येच होते. जिल्हा परिषद निवडणुकीतही, आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील, महाआघाडी विरुद्ध माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजपा अशी निवडणूक होणार आहे.

बार्शीतील निवडणूक मोठी संघर्षमय होणार आहे. राज्यभरात भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष, एकत्र येताना दिसत असले, तरी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकाच व्यासपीठावर, येणे ही बार्शीच्या राजकारणातील मोठी घडामोड आहे. या राजकीय घडामोडीमुळे जिल्हा परिषद निवडणूक, अधिक संघर्षाची ठरणार आहे. मेळाव्यात महाआघाडीच्या उमेदवार निवड, प्रचाराची दिशा आणि भाजपविरोधात, राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा