डोंबिवली – मुंबईमध्ये मराठी तरुणीचा स्टॉल हटवल्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शोरमा विकणाऱ्या मराठी तरुणीचा स्टॉल मुंबईतील महापालिकेने पालिकेने हटवला होता. या घटनेनंतर मनसेचे अविनाश जाधव मार्केटमध्ये पोहोचले. डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या संदर्भात तरुणीने पोस्ट करत आपली बाजू मांडली असता, मनसेचे राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे.
डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा नवीन वादामूळे चर्चेत आला आहे. डोंबिवलीत एक मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते. मात्र, डोंबिवली महापालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, तर इतर हातगाडी आणि फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा दावा, या मराठी तरुणीने केला होता. या संदर्भात या तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली बाजू मांडली असता, या इंस्टाग्राम पोस्टची दखल आता, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, हे डोंबिवलीत जाऊन, असून प्रकरणाची माहिती घेतली आहे. डोंबिवली महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला विरोध करण्यासाठी, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत माहिती घेतली आहे.
डोंबिवली महापालिका अधिकारी माझ्याकडून रोज ३०० रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली आहे, असे म्हणत या मराठी तरुणीने आपल्यावरील अन्यायाची बाजु मांडली आहे. या घडलेल्या प्रकरणावरून मनसे नेते आक्रमक झाले आहेत. डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत. तर दुसरीकडे मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जात आहे. महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला मनसेने विरोध केला आहे.
मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते येताच, डोंबिवलीतील, फेरीवाल्यांची पळापळ झाली आहे. डोंबिवली महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणार्या, मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. डोंबिवली मधील एकता सावंत ही तरुणी रील स्टार आहे. डोंबिवली महापालिका क्षेत्रात ही एकता सावंत ही मराठी तरुणी, शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते, मात्र पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती, यावरून मनसेचे नेते, कार्यकर्ते, व अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.




