भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला, जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न

SHARE:

भंडारा – जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला, जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भंडाऱा जिल्ह्यातील शहापूर येथील ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला, जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे, तर या घटनेत भंडाऱा जिल्ह्यातील शहापूर येथील ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर, पेट्रोल बॉम्बने हल्ला केला आहे. भंडाऱा जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे.

भंडारा जिल्ह्यातील शहापूर परिसरात पहाटेच्या वेळेस, एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला , जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत कुटुंबातील कोणलाही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, मात्र हल्ल्यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन गाडेकर यांच्या घरावर, अज्ञात इसमांनी पेट्रोल बॉम्ब टाकल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास अचानकपणे गाडेकर यांच्या घराच्या समोर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यामुळे घराच्या अंगणात उभ्या असलेल्या ४  दुचाकी आणि घरासमोरील एक 4 चाकीला भीषण आग लागली. काही मिनिटांतच ही सर्व वाहने पूर्णपणे जळून खाक झाली.

आग लागल्याचे लक्षात येताच गाडेकर कुटुंबीयांनी, आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून शेजारी धावून आले. नागरिक जमा होत असल्याचे लक्षात येताच, हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात, आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, तोपर्यंत वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, ही घटना वैयक्तिक वादातून घडली की राजकीय कारणातून, याचा तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर थेट पेट्रोल बॉम्ब हल्ला झाल्याने, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात अधिक तपास भंडारा पोलिस करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा