नागपुर – नागपूरमध्ये पोलीस भरतीची, तयारी करणाऱ्या तरूणीची हत्या करण्यात आली आहे.
नागपुरमध्ये फिरायला जाण्याच्या बहाण्याने एका तरूणाने या मृत तरूणीला घेऊन गेला, व पोलीस भरतीची तयारी करणार्या या तरूणीला संपवले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील, फेटरी गाव परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेने, संपूर्ण नागपुर शहर हादरून गेले आहे. फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने आरोपी तरूणाने, या तरुणीला हॉटेलमध्ये नेले, आणि तिची निर्घृण हत्या केल्याचा, धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत तरुणी ही पोलीस भरतीची तयारी करत असल्याचे समोर आले आहे.
या घटनेत रुचिका राजेश भांगे हिचा मृत्यू झाला आहे. तर सौरभ शिवदास जामगडे असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पळून गेला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. रुचिका ही धनवटे नागपूरमधील, नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती पोलिस भरतीची तयारी करत असून, दररोज पोलीस लाईन टाकळी येथे सरावासाठी जात होती. सराव करत इतर तरुणांसोबत व्यायाम करत असल्याने, सौरभच्या मनात संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. रुचिकाने हे आरोप फेटाळून लावले, तरी सौरभचा संशय वाढत गेला.
सौरभने रुचिकाला फिरायला नेण्याचा बहाणा करून, नागपूरजवळील येतरी परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की , आरोपी सौरभने तीक्ष्ण शस्त्राने रुचिकाच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात रुचिका गंभीर जखमी झाली, आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपी सौरभने, हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत, घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी, तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणात कळमेश्वर पोलीस ठाण्यात , खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी सौरभ जामगडेचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे, तर याप्रकरणात अधिक तपास नागपूर पोलिस करत आहेत.




