भिवंडीमध्ये हुंड्यासाठी महिलेचा छळ केल्याचा प्रकार उघड, या प्रकरणात सासरच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

SHARE:

भिवंडी – हुंड्यासाठी महिलेचा छळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे, तर या प्रकरणात सासरच्यांसह ७  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीमध्ये कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना, एका महिलेचा हुंड्याच्या हव्यासापोटी, छळ केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. भिवंडीतील पीडिते महिलेच्या तक्रारीनंतर, पती आणि सासरच्या ७  सदस्यांविरोधात, महाराष्ट्रातील अंधश्रद्धा व अमानवी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार, कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३६ वर्षीय पीडित महिला सध्या भिवंडीमध्ये वास्तव्यास असून, ती जीवघेण्या आजाराशी लढा देत आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर अनेक वर्षे हुंड्याच्या मागणीसाठी, तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला जात होता. आजारपणालाच कारणीभूत धरत तिला, अपशकुनी ठरवून अघोरी कृत्य केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तक्रारीप्रमाणे, गंभीर आजाराची माहिती झाल्यानंतर ही, उपचारासाठी मदत करण्याऐवजी, छळ करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये पतीने तिला, अल्पवयीन मुलासह घराबाहेर काढले आहे. तर यावेळी तिच्या बहिणी आणि मुलांना मारहाण, झाल्याचेही समोर आले आहे.

यानंतर जानेवारी २०२६ मध्ये पीडित महिला, राहत असलेल्या घराबाहेर जादूटोणाशी संबंधित साहित्य ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार केवळ मानसिक दहशत निर्माण करण्यासाठी नव्हे, तर गंभीर धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने केला आहे. या प्रकरणात पती योगेशकुमार केशरवानी याच्यासह, त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाइकांविरोधात ,भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे ,तसेच महाराष्ट्र नरबळी व अमानुष, अनिष्ट प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निजामपूरा पोलीस अधिकारी या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा