ठाण्यामध्ये ऑनलाईन जॉबच्या नावावर महिलांची फसवणूक, ३ जणांवर गुन्हा दाखल; वर्कफॉर्म होम च्या नावाखाली ८ लाखांनी गंडवले

SHARE:

ठाणे – ऑनलाईन जॉबच्या नावावर महिलांची फसवणूक करण्यात आली आहे, तर याप्रकरणात ३  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात वर्क फ्रॉम होमच्या नावावर महिलांची ८  लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक आणि घरबसल्या कामाच्या नावावर, फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणे शहरात असाच एक गंभीर घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे संपर्क साधत, एका महिलेकडून ८  लाख रुपयांची रक्कम घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात, ३  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावर घरून काम करण्यासंबंधी जाहिरात दिसली. त्यावर प्रतिसाद दिल्यानंतर, एका अनोळखी महिलेकडून व्हॉटस ॲपवर संपर्क साधण्यात आला. पुढे तिला टेलिग्राम ॲपवरील, वेगवेगळ्या खात्यांशी जोडण्यात आले, जिथे ऑनलाईन काम, आणि शेअर मार्केटसदृश गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले.

विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला, कमी रकमेवर नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर हळूहळू अधिक रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करत, वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. काही दिवसांतच तक्रारदाराने जवळपास ८  लाख रुपये ट्रान्सफर केले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठा नफा झाल्याचे आकडे दाखवले गेले, मात्र प्रत्यक्षात ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, वेगवेगळ्या कारणे दाखविण्यात आली. आणखी गुंतवणूक करण्याचा दबाव टाकण्यात आल्याने, फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने, सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात, संबंधित ३  जणांविरोधात फसवणुकीचा, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास सुरू आहे. याप्रकरणात वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मची माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲपवरून येणाऱ्या गुंतवणूक, व वर्क फ्रॉम होम ऑफरबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. अल्प कालावधीत मोठा नफा देण्याचे दावे करणाऱ्या ऑफरवर, विश्वास ठेऊ नये, असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणात ठाणे पोलिस अधिक तपास करित आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा