सातारा – जिल्ह्यातील कराडमध्ये 55 कोटींच्या ड्रग्जसह हजारो कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. पुण्याच्या अंमली पदार्थ विभागाने ही कडक कारवाई केली आहे. कराडमध्ये पाचपुतेवाडीमध्ये कोंबड्याच्या शेडमधून 55 कोटींच्या ड्रग्जस व कोटींचा कच्चा माल जप्त केला आहे. कराडच्या पाचपुतेवाडी येथे, पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, डीआरआय विभागाने मोठी कडक कारवाई केली आहे.
डीआरआय विभागाने ड्रग्स बनवले जात असलेले, कोंबड्यांचे शेड सील केले आहे. याप्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा मोरे याला अटक केली आहे. या ठिकाणाहून डीआरआय पथकाने 55 कोटीचा अमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल, व साहित्य जप्त केले आहे.
ही कडक कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार, करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये ड्रग्ज माफिया वाढत आहेत. त्यामूळे ही कडक कारवाई झाल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात ही एका महिन्यात दुसरी कडक कारवाई झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये मुंबई पोलिसांनी ही सावरी गावात धाड टाकली होती. त्यात ही ड्रग्ज जप्त केले होते. डीआरआय विभागाने केलेल्या कारवाईबाबत, सातारा पोलीसांना ही माहिती नाही. कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स विभागाच्या पथकाने, मोठी कडक कारवाई केली आहे. या पाचपुतेवाडीमध्ये 55 कोटीचा ड्रग्ज तयार केलेला व हजारो कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.
2026 च्या जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी ड्रग्स तयार केले जात होते. सध्या 55 कोटीचा ड्रग्ज हा तयार केला होता. आणि हजारो कोटी रुपयांचा कच्चा माल, या ठिकाणाहून पुणे डीआरआय विभागाने ताब्यात घेतला आहे. कच्च्या मालातून एमडी ड्रग्स बनवला गेला असता तर, हजारो रुपयांचा ड्रग्स तयार झाला असता. वेळीच पुण्यातील डीआरआय विभागाच्या पथकाने, या शेडवर धाड टाकून मोठा ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या कडक कारवाईसाठी गुजरात आणि हैदराबादवरून, अंमली पदार्थ विरोधी पथक कराडमध्ये आले होते. एकूण कारवाई विषयी कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. तपासाअंती या प्रकरणाची अधिकृत माहिती कळू शकणार आहे.




