महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ

SHARE:

बारामती – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ते मुंबई हुन प्रचाराकरिता बारामती कडे रवाना झाले होते. आज बारामती मधे त्यांच्या चार प्रचार सभा होत्या.

बारामतीत ५०० फूटांवरून विमान खाली कोसळले यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा, भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बारामती विमानतळापासून नजीकच असताना हा मोठा अपघात झाला आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी हादरवणारी आहे.

बारामतीमध्ये लँडिंगच्या बेळी हा अपघात झाला आहे. अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, यामध्ये ६  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास बारामती मध्ये, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभांसाठी अजित पवार बारामतीकडे येत होते. मुंबईहून ते बारामतीच्या दिशेने विमानाने येत असतानाच बारामती विमानतळापासून नजीक ५०० फूट उंचावर विमान दरीत कोसळले, यावेळी मोठे धुराचे लोट उठले होते. दरीमध्ये एका शेतात हे विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे बारामती आणि पवार कुटुंबासह शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले आहे. या अपघाताचे वृत्त समजताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सर्व राजकीय दौरे रद्द केले आहे. या निधनाची बातमी समजताच देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, तसेच देशातील व राज्यातील बड्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

साप्ताहिक रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या वतीने सुद्धा अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

Leave a Comment

अधिक वाचा