देशभरात यूजीसी नवीन धोरणांविरुद्ध निदर्शने, भाजपा विरोधात सोशल मीडिया आणि राजकीय पक्षांत संताप

SHARE:

नवी दिल्ली – देशभरात यूजीसी नवीन धोरणांविरुद्ध निदर्शने होत आहेत, तर देशात भाजपा विरोधात सोशल मीडिया आणि राजकीय पक्षांत संताप व्यक्त केला जात आहे. देशभरात यूजीसी नवीन धोरणांविरुद्ध निदर्शने तीव्र झाली आहेत. भाजपा पक्षांत अनेक पक्ष कार्यकर्ते आणि अधिकारी यूजीसीच्या नवीन नियमांना “काळे कायदे“ म्हणत राजीनामा देत आहेत. उच्च शिक्षणात समानता आणण्याच्या नावाखाली हे नियम आणण्यात आले होते, यामुळे पक्षासाठी एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

देशात यूजीसी विधेयक वरून गोंधळ सुरू आहे. यूजीसी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने केली जात आहेत. यूजीसीच्या नवीन नियमामुळे सोशल मीडिया आणि राजकीय पक्षांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भाजपातील लोकांनी पक्षाला तीव्र विरोध केला आहे. भारतात अनेक राज्य आणि जिल्हास्तरीय भाजप अधिकाऱी यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले आहेत. भाजपा सरकारवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यूजीसीच्या नवीन नियमाचे वर्णन सामान्य श्रेणीतील, सदस्यांविरुद्ध भेदभाव करणारा असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादीसारखे भारतातील अनेक पक्ष फोडणाऱ्या भाजप पक्षात ही फूट पडली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा