मुंबई – राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकानंतर, सातारा गॅजेट लागू होण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर, महाराष्ट्रात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारकडून त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. सातारा आणि औंध गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने महिन्याचा कालावधी मागितला आहे. या सातारा गॅझेट मधील नोंदी प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील कुणबीना प्रमाणपत्र देण्यात येणार होते.
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील कुणबी नोंदी असणार्यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी, सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात निर्णय शक्यता होण्याची आहे. सातारा आणि औंध गॅझेटियरमध्ये कोल्हापूर आणि सोलापूरच्या मराठा लोकांचा समावेश नाही. यामुळे सातारा गॅझेटियरचा लाभ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला मिळण्याबाबत अडचणी आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सातारा गॅजेट लागू करण्यात अडचणी येत आहेत. गैरसमज दूर करत मराठा आरक्षणासंदर्भात सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडली आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली आहे. सध्या हैद्राबाद गॅझेट लागू केल्याने मराठा लोकांना कुणबी ओबीसी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा गॅझेट लागू केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला, कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
पश्चिम महाराष्ट्रात १८८५ चे शासकीय राजपत्र म्हणजेच गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठा लोक हे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे. त्यांच्या वंश परंपरा एकच आहेत. विवाह पद्धती धार्मिक कार्यक्रम आणि आडनावे त्याचबरोबर शेती हा, प्रमुख व्यवसाय असल्याची नोंद या गॅझेटमध्ये आढळते. १८८५ च्या सातारा गॅझेटियरमध्ये १८८१ च्या जनगणनेत ५ लाख ८३ हजार कुणबी नोंद असल्याचे नमूद आहे. सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी १८१९ मध्ये जनगणना राबवली होती. ही जनगणना जातनिहाय होती.
या जनगणनेत शेती करणार्या मराठा लोकांच्या गावागावात कुणबी म्हणून नोंदी आढळतात. ज्यांचा व्यवसाय शेती आहे मात्र ते मराठा समाजातील आहेत, त्यांची कुणबी म्हणूनच नोंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी कुणबींचा मराठा म्हणून सुद्धा उल्लेख आढळतो. हीच पद्धत पुढे ब्रिटिशांनी सुरू ठेवली. सध्या चर्चेत असलेल्या १८८५ च्या गॅझेटमध्ये या नोंदी आढळतात. १८८५ गॅझेटिअर आणि त्यामागील नोंदीचा फायदा नक्कीच सातारा आणि पुणे जिल्ह्यातील कुणबी मराठा लोकांना होईल. मात्र, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी मराठा लोकांना, वेगळ्या गॅझेटिअरची मदत घ्यावी लागणार आहे.




