मुंबई – राज्यात मराठी न शिकविणार्या शाळांची तपासणी होणार आहे. यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे राज्यातील शिक्षण आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य असतानाही , आयसीएसई, सीबीएसई आणि आयबी बोर्डाच्या शाळांसह काही , खासगी शाळांमध्ये मराठी भाषा शिकविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या संदर्भात मराठी न शिकविणार्या शाळांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने काही महिन्यांपूर्वी, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केली होती. याची गंभीर दखल घेत अशा शाळांबाबत, तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश, शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन, आणि अध्यापन सक्तीचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारने यासंदर्भातील आदेशही जारी केले होते. या आदेशाच्या आधारे शिक्षण विभागाने शासन निर्णय लागू केला आहे, तर राज्यात सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्याची सूचना केल्या आहेत. मात्र त्याकडे अनेक शाळांनी दुर्लक्ष सुरु केल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने, राज्य सरकारला निवेदन देत याप्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची दखल घेत, राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तालय कार्यालयाला याबाबत, त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मराठी भाषा न शिकविणार्या शाळांची तपासणी करून त्यासंदर्भात ,अहवाल राज्य सरकारला सादर करावा, असे आदेश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. आता राज्यात मराठी भाषा शिकवित नसलेल्या, आयसीएसई, सीबीएसई आणि आयबी बोर्डाच्या सर्व शाळांसह, राज्यातील सर्व खासगी शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जात आहे का? याची गांभीर्याने चौकशी होणार आहे, असे राज्यातील शिक्षण विभागाने म्हटले आहे.




