हिंगणघाट – विश्व हिंदू परिषदेच्या मासिक बैठकीत विश्व हिंदू परिषद तर्फे हिंगणघाट शहर बजरंग दल साप्ताहिक मिलन व सत्संग समिती गठीत करण्यात आली. हिंगणघाट येथे मागील तीन वर्षापासून प्रत्येक शनिवारी बजरंग दल हिंगणघाट तर्फे सत्संग व हनुमान चालीसा पठण केल्या जाते यामध्ये हिंदू धर्मीय तरुण, मुलं हिररीने भाग घेतात त्याचाच भाग म्हणून हिंगणघाट शहरात बजरंग दल मार्फत प्रत्येक मंदिरात साप्ताहिक मिलन, सत्संग व हनुमान चालीसा पठण राबविण्याचा विश्व हिंदू परिषदेचा मानस आहे या करिता एक बजरंग दल मार्फत साप्ताहिक मिलन व सत्संग समिती तयार करून ती प्रत्येक मंदिरात जाऊन कशाप्रकारे बजरंग दल तर्फे चालणारा सत्संग, हनुमान चालीसा पठण करायचे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे.
या वेळी बजरंग दल हिंगणघाट शहर साप्ताहिक मिलन व सत्संग प्रमुख म्हणून पियुष म्युनिश्वर,सहप्रमुख जीवेश मुंगले, सदस्य म्हणून पियुष हटवार,कार्तिक हंबर्डे,चेतन मिसारकर यांच्यावर दायित्व देण्यात आले. या वेळी विहिप वर्धा जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार,विहिप वर्धा जिल्हा धर्म प्रसार प्रमुख अजय भोंग, विहिप वर्धा जिल्हा विशेष संपर्क प्रमुख गजानन मसाये,विहिप वर्धा जिल्हा सहसेवा प्रमुख ओमप्रकाश मस्कर, वर्धा जिल्हा धर्म प्रसार टोळी सदस्य प्रा. संदीप सातपुते, विहिप वर्धा जिल्हा मातृशक्ती संयोजिका विद्या पेंडके, विहिप वर्धा जिल्हा विधी प्रकोष्ट प्रमुख ॲड. राखी वैरागडे, विहिप हिंगणघाट प्रखंड मंत्री देवा वाघमारे, विहिप हिंगणघाट प्रखंड सहमंत्री प्रमोद टिपले, हिंगणघाट नगर प्रखंड सहमंत्री रोशन चंदनखेडे, मातृशक्ती संयोजिका प्रिती जोशी, हिंगणघाट शहर स्वावलंबी भारत सहप्रमुख रवी नौकरकर, सुरेश बुराडकर, संदीप मोटवानी, प्रणय बालपांडे, शंकर गेडेकर या वेळी उपस्थित होते.
बजरंग दल साप्ताहिक मिलन व सत्संग समिती कडून हिंदू धर्मातील तरुणांना त्यांच्या वॉर्डातील मंदिरात जाऊन सत्संग, हनुमान चालीसा याच्या बद्दल प्रात्यक्षिक देऊन त्यांना या विषयीची आवड लागावी आणि हिंदू धर्मातील लोकांनी प्रत्येक सप्ताहात एकत्र येणाचा हा सुद्धा एक भाग, कारण होईल आणि हिंदू धर्मात एकोपा वाढेल ही भावना ठेऊन ही साप्ताहिक मिलन व सत्सग समिती तयार करण्यात आली या वेळी सर्व नवीन समितीतील सदस्यांचे राम नामाचा दुपट्टा टाकून अभिनंदन करण्यात आले..




