बिहार – शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. बिहारमधील एका शाळेत ३४० विद्यार्थ्यांसाठी फक्त ६ शिक्षक आणि ४ खोल्या आहेत, हा प्राकर उघडकीस आला आहे. बिहारमधील सुपौलमधील एका शाळेत बिहारच्या शिक्षण व्यवस्थेची स्थिती उघडकीस आली आहे. शाळेत ३४० मुले आणि फक्त ४ खोल्या आहेत. सुपौल येथील अनंतपूर येथील माध्यमिक शाळा गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. येथील शाळेत ३४० विद्यार्थ्यांसाठी फक्त ६ शिक्षक आणि ४ खोल्या आहेत, ज्यामध्ये एक जुनी इमारत आहे. या जीर्ण झालेल्या जुन्या इमारतीत मूले शिक्षण घेत असताना कधीही अपघात होऊ शकतो, अशी अवस्था इमारतीची आहे. या शाहेला मागील ६ वर्षांपासून विकास निधी दिलेला नाही, तर यामूळे येथील शाळेतील मूलांचे पालक चिंतेत आहेत.
अनंतपूर येथील माध्यमिक शाळा सध्या गंभीर समस्यांना तोंड देत आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्याचा दावा करणारी सरकारी व्यवस्था, वास्तवापासून दूर असल्याचे दिसते आहे. शाळा १ ली ते ८ वी पर्यत वर्ग आहेत परंतु,कोणत्याही सुविधा नाहीत, तर यामूळे शाळेतील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. अनंतपूर येथील माध्यमि शाळेत एकूण ३४० मुले आहेत, तर त्यांना शिकवण्यासाठी फक्त ६ शिक्षक आहेत. शिवाय, या मोठ्या संख्येने विद्यार्थी राहण्यासाठी शाळेत फक्त ४ खोल्या आहेत. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत शिक्षण मूलांना शिक्षण दिले जात आहे.
ज्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. स्थानिक नागरिकांचे व शाहेतील पालकांचे म्हणणे आहे की, ही इमारत वर्षानुवर्षे जुनी आहे आणि तिची स्थिती इतकी वाईट आहे की, पावसाळ्या मुलांना तिथे बसवणे धोकादायक आहे. काल बुधवारी शाळेत फक्त १६५ मुले उपस्थित होती. या संदर्भात, शाळेचे कार्यवाहक मुख्याध्यापक धीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, सरस्वती पूजा आणि प्रजासत्ताक दिनामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. त्यांनी सांगितले की, शाळेत केवळ शिक्षकांची कमतरता नाही, तर मूलभूत सेवा सुविधांचाही कमी आहे.
शाळेला आवश्यक ते साहित्य मिळालेले नाही. मुख्याध्यापकांनी सांगितले की शाळेला डेस्क, बेंच, कृषी टेबल आणि यासारखे आवश्यक साहित्य मिळालेले नाही, जे प्रत्येक राज्यातील सरकार प्रत्येक शाळेला पुरवते. याचा केवळ शिकण्यावर परिणाम होत नाही, तर शाळेची व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे. गेल्या ६ वर्षांपासून शाळेला शालेय विकास निधी मिळालेला नाही, ज्यामुळे दुरुस्ती, साफसफाई आणि इतर आवश्यक कामे रखडली आहेत. स्थानिक पालक देखील या परिस्थितीमुळे खूप नाराज आहेत. कधीही मोठी दुर्घटना घडू शकते.
ते म्हणतात की, बिहार सरकार शिक्षणाचा स्तर सुधारण्याबद्दल बोलत आहे, परंतु वास्तविकता पूर्णपणे उलट आहे. जर शाळेची जीर्ण स्थिती त्वरित दूर केली नाही तर, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेतील मूलांच्या पालकांनी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने तात्काळ अतिरिक्त वर्गखोल्या बांधाव्यात, शिक्षकांची नियुक्ती करावी आणि मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रलंबित विकास निधी मंजूर करावा अशी मागणी मुख्याध्यापंकांनी केली आहे.




