बिहार – राज्यातील छापरामध्ये मानवी तस्करीचे जाळे उघड करण्यात आले आहे. या प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आले आहे. मानव तस्करीबाबत मोठा खुलासा झाला आहे. बिहार राज्यातील छपरा जंक्शनवर ८ अल्पवयीन मुलांना बालमजुरीसाठी ट्रेनमधून नेत असताना ताब्यात घेतले आहे. मोठे मानवी तस्करीचे जाळे उघडकीस आले आहे. रेल्वे संरक्षण दल आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांनी छपरा जंक्शनवर एका मोठ्या मानवी तस्करीच्या टोळीचा भांडाफोड केला आहे. कर्मभूमी एक्सप्रेसमधून पंजाबला नेण्यात येत असलेल्या ८ अल्पवयीन मुलांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले आहे. बालमजुरीतून ८ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात ३ मानवी तस्करांना अटक केली आहे. छापरा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
छापरामधील सारण रेल्वे संरक्षण दल आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांच्या दक्षतेमुळे छपरा जंक्शनवर एका संघटित मानवी तस्करीच्या टोळीला पकडण्यात आले आहे. या कारवाईत बालमजुरीसाठी पंजाबमध्ये नेण्यात येत असलेल्या 8 अल्पवयीन मुलांची कर्मभूमी एक्सप्रेसमधून सुटका करण्यात आली आहे. तर ३ मानवी तस्करांना घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे. बिहार राज्यातील “बचपन बचाओ आंदोलन“ मोहिमेअंतर्गत, एका विशेष मोहिमेचा भाग म्हणून ही कडक कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त एस. रामकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त आरपीएफ मुकेश कुमार पनवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे.
आरपीएफ पोस्टचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार यादव म्हणाले की ,त्यांना मानवी तस्करीशी संबंधित गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर, छापरा जंक्शनवर विशेष दक्षता ठेवण्यात आली होती. कर्मभूमी एक्सप्रेस स्टेशनवर येताच, छपरा आरपीएफ पोस्ट आणि सीबीआयच्या संयुक्त पथकाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. या पथकाने ८ अल्पवयीन मुलांसह प्रवास करत असलेल्या ३ संशयास्पद व्यक्तींना ट्रेनमधून उतरल्यावर चौकशी सुरू केली, यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.
या कडक कारवाईत आरपीएफ पोस्टचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार यादव, सीबीआय निरीक्षक संजय कुमार , आरपीएफ उपनिरीक्षक विशाल, एएसआय ब्रिज सुंदर, कॉन्स्टेबल वकील प्रसाद आणि दिलीप कुमार यांचा समावेश होता. चौकशीदरम्यान, आरोपींकडून अनेक गंभीर गुन्हे उघड झाले आहेत. या मानव तस्करांनी कबूल केले की, या 8 अल्पवयीन मुलांना पंजाबमध्ये बालमजुरीसाठी नेले जात होते आणि ही एक योजना होती. पंजाबच्या शेतात त्यांना कामावर लावण्याचा कट रचण्यात आला होता. या ८ अल्पवयीन मुलांना बटाटा शेतीत मजूर म्हणून काम करण्यासाठी, पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात नेले जात होते. आरोपींनी त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ हजार रुपये अॅडव्हान्स देऊन मुलांना खोटे आमिष दाखवून आणले होते.
ही ८ अल्पवयीन सर्व मुले बिहार राज्यातील पूर्णिया आणि कटिहार जिल्ह्यातील रहिवासी आहेत, आणि त्यांची वय १४ ते १५ वर्षे आहे. बिहार राज्यातील कटिहार जिल्ह्यातील फाळका पोलिस स्टेशन परिसरातील, लक्ष्मीपूर येथील रहिवासी रणजित कुमार, पूर्णिया जिल्ह्यातील भवानीपूर पोलिस स्टेशन परिसरातील, श्रीपूर येथील रहिवासी सूरज कुमार मंडल आणि मधेपुराच्या वॉर्ड क्रमांक ३ येथील रहिवासी मोहम्मद कमल अशी अटक करण्यात आलेल्या मानव तस्करांची नावे आहेत. तीनही आरोपींना छपरा जंक्शन येथील जीआरपी पोलिस स्टेशनने ताब्यात घेतले आहे.
आरपीएफने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सर्व 8 अल्पवयीन मुलांना चाइल्ड हेल्पलाइनकडे सोपवले आहे. जेणेकरून त्यांना सुरक्षित संरक्षण आणि पुढील मदत मिळू शकेल. जीआरपीने वेवेगळ्या कलमाखली कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. जीआरपी उपनिरीक्षक नंदिनी कुमारी या प्रकरणाचा अधिक तपास जीआरपी उपनिरीक्षक नंदिनी कुमारी करत आहेत. बिहार राज्यात यापूढे बाल तस्करी आणि बालमजुरी विरुद्ध मोहीम सुरू राहील, असे प्रशासनाने सांगितले आहे.




