देशाचे प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठका बोलावत नाही आणि पुरेशी चर्चा न करता विधेयके मंजूर करतात; काँग्रेस खासदार जयराम रमेश यांचा आरोप

SHARE:

नवी दिल्ली – देशाचे प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठका बोलावत नाही आणि पुरेशी चर्चा न करता विधेयके मंजूर करतात, असा आरोप काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी देशातील भाजपा सरकारवर व प्रधानमंत्री मोदींवर केला आहे. देशातील भाजपा सरकारचे प्रधानमंत्री मोदी हे देशाला चूकीचा संदेश देत आहेत. काँग्रेसने नरेंद्र मोदींवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत ढोंगीपणाचा आरोप केला आहे. पक्षाच्या प्रभारी सरचिटणीसांनी सांगितले की, देशाचे भाजपा सरकारमधील प्रधानमंत्री मोदी हे संसदेत सर्वपक्षीय बैठका बोलावत नाहीत, आणि पुरेशी चर्चा न करता कोणतीही विधेयके मंजूर करतात.

काँग्रेसने मोदी यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरील भाष्यांवरून भाजपा सरकार व प्रधानमंत्री मोदीवर टीका केली आहे. देशात प्रत्येक अधिवेशन सुरू होण्यापूर्वी “देशाला तोच फसवा संदेश“ देतात. आजचा निषेध त्याचाच भाग आहे. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी हे राष्ट्रीय मुद्द्यांवर विरोधकांना विश्वासात घेण्यासाठी, सर्वपक्षीय बैठका बोलावणार नाहीत किंवा अध्यक्षपद भूषवणार नाहीत.“

काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी हे अचानक विधेयके सादर करतील आणि आवश्यक कायदेशीर तपासणी शिवाय संसदेत ती मंजूर करतील. ते पुढे म्हणाले की प्रधानमंत्री मोदी संसदेत बसून, विरोधी नेत्यांच्या चिंता दूर करणार नाहीत, तर त्याऐवजी दोन्ही सभागृहांमध्ये निवडणूक सभांमध्ये भाषणे देतील. प्रधानमंत्री “प्रत्येक अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, ते संसदेतून नुसते राष्ट्राला ’संदेश’ देतील, असे काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा