दिल्लीमध्ये अल्पवयीन मूलीवर लैंगिक अत्याचार, ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून अटक

SHARE:

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये अल्पवयीन मूलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. तर ३ अल्पवयीन मुलांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ६ वर्षांच्या अल्पवयीन मूलीचे सामुहिक शोषण करण्यात आल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. १३ ते १५ वर्षांच्या अल्पवयीन ३ मुलांनी हे कृत्य कले आहे. याप्रकरणामूळे दिल्ली हादरली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील भजनपुरा परिसरात ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर-पूर्व दिल्लीतील भजनपुरा परिसरात 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणात १३ , १४ आणि १५ वर्षांच्या ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे राजधानी दिल्लीमधील स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहे. ही घटना १८ जानेवारी २०२६ रोजी घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे दिल्लीबाहेरील रहिवासी आहेत. दिल्लीतील भजनपुरात एका फॅक्टरीत काम करतात.

आरोपींनी पीडित मुलीला खाण्याचे आमिष दाखवून आपल्या सोबत नेले. इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित मुलगी घरी आल्यानंतर कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आला आहे. पीडित मूलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडितेवर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात २४ जानेवारी २०२६ रोजी भजनपुरा परिसरात नागरिकांनी आंदोलन केले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील भजनपूरा परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून विविध कलमांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. आला आहे. या दिल्लीतील घटनेने पुन्हा एकदा देशातील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात अधिक तपास दिल्ली पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा