अकोला – काँग्रेस व एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला आहे, तर ३ नगरसेवक तटस्थ राहिल्यामूळे वाद वाढला आहे. अकोला महापालिकेमध्ये दोन पक्षांच्या गटांत वाद झाला आहे. काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या शारदा खेडकर यांची निवड झाल्यानंतर अकोला महापालिका सभागृहात वादाची घटना घडली आहे. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवडीनंतर सभागृहात वाद झाला आहे. एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली आहे. अकोला महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप एमआयएम कडून करण्यात आला आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहातच बांगड्या फेकल्या आहेत.
अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा ४५ विरुद्ध ३२ मतांनी पराभव केला आहे. एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांसोबत भिडले आहे. ३ नगरसेवक तटस्थ राहिल्यामूळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी, एमआयएमच्या नगरसेवकांसोबत वाद घातला आहे. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी अचानक भाजपला पाठिंबा दिला होता. दुसरीकडे एमआयएमचे ३ नगरसेवक तटस्थ राहिले. महापालिकेत काँग्रेसने केलेला दावा खोटा ठरला आहे.




