बंगाली भाषिक मुस्लिमांवर वादग्रस्त टिप्पणी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

SHARE:

नवी दिल्ली – बंगाली भाषिक मुस्लिमांवर वादग्रस्त टिप्पणीवरून, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ’मिया’ मुस्लिमांवरील फूट पाडणार्या टिप्पणीबद्दल मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. बंगाली भाषिक मुस्लिमांवरील वादग्रस्त टिप्पणीबद्दल सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गोविंद माथूर यांनी सांगितले की, शर्मा यांचे विधान धर्माच्या आधारावर नागरिकांना विभाजित करण्याचा प्रयत्न आहे, आणि मुख्यमंत्री हे भारताच्या घटनात्मक चौकटीच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करत आहे.

बंगाली भाषिक मुस्लिमांवरील वादग्रस्त टिप्पणीनंतर, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती गोविंद माथूर यांनी म्हटले की, बहिष्कार किंवा द्वेष पसरवून भारतीय लोकशाहीचा पाया कमकुवत करण्याच्या प्रकरणात ते दोषी ठरू शकतात. शांतता आणि न्याय कार्यकर्ते आणि लेखक हर्ष मंदर यांनी सांगितले की, त्यांनी मंगळवारी २७ जानेवारी २०२६ मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक विधानांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. मंदर यांच्या मते, ही विधाने “आसाममधील बंगाली भाषिक मुस्लिमांविरुद्ध द्वेष, छळ आणि भेदभाव वाढवतात.“

मंदर यांनी सांगितले की त्यांनी भारतीय दंड संहिता, २०२३ च्या संबंधित कलमांखाली, त्वरित कारवाई आणि एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. यामध्ये कलम १९६ गटांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक सौहार्द राखण्यास बाधा आणणारी कृत्ये करणे, १९७ राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी विधाने, २९९ धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने दुर्भावनापूर्ण कृत्ये, ३०२ धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द आणि ३५३ सार्वजनिक दुष्कर्म घडवून आणणारी विधाने यांचा समावेश आहे. आसाममध्ये सुरू असलेल्या विशेष सुधारणा प्रक्रियेदरम्यान भविष्यात, अशी विधाने होऊ नयेत यासाठी योग्य चौकशी करावी आणि त्वरित पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. मँदर यांनी दिल्लीतील हौज खास पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मंदर म्हणाले की, मंगळवारी तिनसुकिया जिल्ह्यातील दिग्बोई येथे एका सरकारी कार्यक्रमात शर्मा यांनी बंगाली भाषिक मुस्लिमांना “मिया“ असे संबोधले आणि त्यांना मतदार यादीतून वगळण्यास प्रोत्साहन देणारी विधाने केली.शर्मा यांनी मतदार यादी पुनरावृत्ती प्रक्रियेत ही भाजप कार्यकर्त्यांना, मुस्लिम समुदायाच्या सदस्यांविरुद्ध तक्रारी आणि आक्षेप नोंदविण्याचे आदेश दिले होते.

मंगळवारी शर्मा म्हणाले होते की, परंतु माझे काम मिया मुस्लिम लोकांचे जीवन जगणे अवघड करणे काम आहे.“ त्यांनी लोकांना कोणत्याही प्रकारे मुस्लिम समुदायाला त्रास देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, जोपर्यंत मुस्लिमांना त्रास दिला जात नाही तोपर्यंत ते आसाम सोडणार नाहीत. मंदर यांनी म्हटले की “हिमंत बिस्वा शर्मा आणि भाजपा पक्ष हे मुस्लिम समुदायाच्या विरोधात आहेत,“ आणि हे आसामचे मुख्यमंत्री लोकांना मुस्लिम समुदायाला “छळ“ करण्याचे आवाहन करतात. शर्मा यांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांचे सरकार मियां मुस्लिमांना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना त्रास देत राहतील.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती निवृत्त गोविंद माथूर यांनी म्हटले आहे की ,आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांचे विधान धर्माच्या आधारे नागरिकांना विभाजित करण्याचा, आणि भारताच्या घटनात्मक चौकटीच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधानाच्या कलम १४ मध्ये कायद्यासमोर देशातील सर्वाना समानतेची हमी दिली आहे, कलम १५ मध्ये देशात कोणत्याही धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे ,आणि कलम २१  मध्ये देशातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा