गर्भलिंगचाचणी प्रकरण, जनता दलाचे नेते डॉ. अनंत राम यांच्यासह ४ जणांना अटक; हरियाणा रोहतक मधील घटना

SHARE:

हरियाणा – राज्यात गर्भलिंगचाचणी प्रकरणात, जनता दलाचे नेते डॉ. अनंत राम यांच्यासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. रोहतक मधील बारवाला येथील जेजेपी नेत्याला गर्भलिंग चाचणी प्रकरणात अटक केली आहे, तर पीएनडीटी कायद्यांतर्गत दहावर्षात ६  वेळा गुन्हे दाखल आहेत.

बरवाला येथून ५ वेळा निवडणूक लढवणारे डॉ. अनंत राम यांना यापूर्वीही न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदानाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून, आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने जननायक जनता दलाचे माजी बारवाला विधानसभेचे उमेदवार डॉ. अनंत राम यांच्यासह ४ जणांना अटक केली. त्यांना आझाद नगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणात पीएनडीटी कायद्याअंतर्गत, एकूण ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीएनडीटीच्या अधिकारी डॉ. अनामिका बिश्नोई यांनी सांगितले की, आझाद नगरमधील एका क्लिनिकमध्ये गर्भवती महिलांच्या गर्भाचे बेकायदेशीर लिंग चाचणी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे, पोलिसांसह आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि कारवाई केली आहे. डॉ. अनंतराम आणि त्यांच्या ४ साथीदारांना अटक केली आहे.

तपासात, गर्भाच्या लिंग निर्धारणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. गर्भाच्या लिंग निर्धारण प्रकरणांसंदर्भात डॉ. अनंतराम प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, तर त्यांची काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.२०२३ मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता, त्यानंतर त्यांनी अनेक महिने न्यायालयीन कोठडीत घालवले आहे. डॉ. अनंतराम हे राजकीयदृष्ट्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी बरवाला विधानसभा मतदारसंघातून ५ वेळा निवडणूक लढवली आहे. परंतु प्रत्येक वेळी त्यांना पराभूत झाले आहेत.

डॉ. अनंत राम यांच्याविरुद्ध २८ जून २०१५ रोजी हिसार पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला होता, जो न्यायालयात प्रलंबित आहे. नंतर ५ मे २०१६ रोजी बरवाला पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला होता, त्यात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. १८ डिसेंबर २०१८ रोजी बरवाला पोलिस ठाण्यात गून्हा दाखल, १४ जुलै २०२१ रोजी गून्हा दाखल, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी बारवाला पोलिस ठाण्यात गून्हा क्रमांक नोंदवण्यात आला होता. हे सर्व खटले सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. आता परत डॉ. अनंतराम यांच्यावर गून्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा