पुणे – पुण्यातील युवक व युवतींसाठी आनंदाची बातमी आली आहे. पुण्यामध्ये लवकरच पोलीस भरती होणार आहे, तर १० ते १५ फेब्रुवारीला मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मोठी पोलीस भरती होणार आहे. तर १० ते १५ तारखेपासून पोलिस भरती चाचणीला सुरुवात होऊ शकते. राज्यात पुणे शहराच्या सीमांचा विस्तार आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता, पुणे पोलीस दलावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आता प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली पोलीस भरती या महिन्यात होणार आहे. राज्यातील पोलिस खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. पुणे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी, गृह विभागाने पोलिस भरतीसाठी आदेश दिला आहे.
या पोलिस भरती प्रक्रियेसाठी तारीख प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. लवकरच राज्यात पोलिस भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यात पोलिस भरतीसाठी तयारी करत असलेल्या हजारो तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.पुणे शहराची सध्या सुरक्षावरून मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. शहरात दिवसेंदिवस गून्हेगारी वाढत चालली आहे. आणि शहराच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी संख्या कमी पडत आहे. पुणे शहराची सुरक्षा सध्या केवळ कमी पोलीस बळावर अवलंबून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता ,पुणे पोलीस दलात २१ हजार पोलिस कर्मचाऱ्यांची गरज असताना, प्रत्यक्षात पुणे शहरात १० हजार पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत.
या ५० टक्के पोलिस कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे, पुणे शहरातील पोलिसांना २४ तास काम कराने लागत आहे.त्याचा गंभीर परिणाम पोलिसांच्या मानसिक आणि कौटुंबिक आरोग्यावर होत आहे. गेल्या वर्षी पुणे शहरात सुरक्षेसाठी ५ नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले आहेत. मात्र आवश्यक पोलिस कर्मचारी पदभरती न झाल्यामूळे पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. शहरात पोलिस कर्मचारी संख्या कमी पडत आहे. पुण्यातील नव्या पोलिस स्टेशनमूळे काम वाढले आहे. तरी शहरात पोलिस कर्मचारी मात्र कमीच आहेत. यामुळे पुणे शहर पोलिसांवरील ताण वाढला आहे. पोलिस कर्मचार्यांची रिक्त पदे लवकर भरण्याची मागणी होत आहे.
पुण्यातील पोलिस भरतीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या संदर्भातील नियोजन केले आहे. पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी १० ते १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. या पोलिस भरतीसाठी व मैदानी चाचणीसाठी पुणे शहरासह राज्यभरातून हजारो तरुण-तरुणी पोलिस भरतीसाठी पुण्यात येण्याची शक्यता आहे. पुण्यात एवढ्या मोठ्या संख्येने येणार्या पोलिस भरती उमेदवारांची राहण्याची व्यवस्था, मैदानांची सज्जता आणि पारदर्शक चाचणी प्रक्रियेसाठी पुणे पोलीस प्रशासनाने आतापासूनच सुरूवात केली आहे. भरतीसाठी मैदानी चाचणीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पोलीस दलातील मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू केली आहे. या पोलिस भरतीमुळे प्रामुख्याने तीन मोठे बदल होणार आहेत. प्रथम, पुण्यातील पोलिसांच्या कामाचा ताण कमी होईल; नवीन पोलिस कर्मचारी आल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांना हक्काच्या साप्ताहिक सुट्टया आणि कामाचे तास कमी होतील. पुण्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल. पुणे शहरात नव्याने सुरू झालेल्या पोलीस स्टेशनला नवीन पोलिस कर्मचारी मिळाल्यास शहरातील बंदोबस्त आणि गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार आहे.




