राशीभविष्य – आज २ फेब्रुवारी २०२६ , आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज महिलांना आपला दृष्टिकोन बदलायला लागेल, परंतु प्रतिकूल परिस्थितीतूनही तुमच्या पराक्रमाला ऊर्जा मिळेल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज पुढील महत्त्वाच्या कामाचे नियोजन करा, नोकरी धंद्यात बरोबरीचे लोक पुढे जाण्याची शक्यता.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज नव्या उमेदीने कामाला लागाल, स्थावर मालमत्तेच्या प्रश्नाचे घोंगडे भिजतच पडेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज कमकुवत प्रकृतीच्या व्यक्तींनी पथ्य पाणी सांभाळावे, नोकरी धंद्याच्या ठिकाणी जरा जास्तच कष्ट पडतील
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज वरिष्ठांनी आश्वासन दिले तरी ते लगेच पूर्ण होणार नसल्याने त्यात फारसा रस तुम्ही घेणार नाही.
कन्या रास (Virgo)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज तुम्ही जेथे काम करता तेथे अचानक काही बदल संभवतात, अशावेळी तुमच्याशिवाय त्यांचे काही चालणार नाही.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांनी त्यांना अवगत असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा, आर्थिक गोष्टींमध्ये थोडी अनिश्चितता दाखवते.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज मित्रमंडळींशी भांडणाचे प्रसंग उद्भवतील, घरात आणि घराबाहेर तुमच्याकडून एक प्रकारची व्यावहारिक बैठक घेतलेली तुम्हाला जाणवेल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज भावना गुंडाळून ठेवून कठोर निर्णय घ्याल, आज स्वतःचा विचार जरा जास्तच कराल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज सतत काहीतरी नवीन शिकण्याची धडपड चालू राहील, जोडीदाराशी वाद संभवतात.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल, तुमची मते घरातील लोकांना पटणार नाहीत.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज थोडा ताण वाढेल आणि मानसिक स्वास्थ्य गमावून बसाल, त्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानून घ्यावे लागेल.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)




