आज मंगळवार, दि. ०३ फेब्रुवारी २०२६ ! वीर हनुमानाची कृपा कोणावर होणार, वाचा आजचे राशीभविष्य.

SHARE:

राशीभविष्य – आज ३ फेब्रुवारी २०२६ , आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. वीर हनुमानाची कृपा कोणावर होणार, कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास 
मेष राशीच्या लोकांनो आज महिलांनी भावना प्रगट करताना संयम राखावा, तुमच्या वागण्या बोलण्यात संघर्षाचा प्रतिकराचा भाग जास्त राहील.

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही, भावनांशी थोडी वाद संभवतात.

मिथुन रास 
मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यापारात सतत काहीतरी उलाढाल करण्यात गुंतून जाल, परंतु त्यामधील काही गुप्त गोष्टी ठेवण्याकडे कल राहील.

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज कानाचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरी उपचार वेळेवर घ्यावेत, घरगुती कारणासाठी लहान मोठे प्रवास करावे लागतील.

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी आज आपल्या विचारांशी पक्के राहाल, त्यामुळे समोरच्या लोकांना तुम्ही हटवादी वाटू शकता.

कन्या रास 
कन्या राशींच्या लोकांसाठी आज आशावादी दृष्टिकोन ठेवल्यामुळे बरीच कामे मार्गी लावाल, पैसा मिळवण्या संदर्भात मोहाचे क्षण बाजूला करावे लागतील.

तूळ रास 
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्याकडे असलेले ज्ञान इतरांना देण्याची संधी चालून येईल, त्यामध्ये मान अधिकार मिळेल.

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज वडिलांकडून मदत मिळेल, अति विचारामुळे डोकेदुखी निर्माण होईल.

धनु रास 
धनु राशीच्या लोकांनो आज राजकारणी लोकांना आपली मते समाजापुढे मांडण्याची संधी मिळेल, महिला अति व्यवहारी बनतील.

मकर रास 
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील रसिकता लोकांना कळेल, कलाकारांना आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळेल.

कुंभ रास 
कुंभ राशीच्या लोकांनो आज मान सन्मान मिळेल, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उल्हासित वातावरण लाभल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल.

मीन रास 
मीन राशीच्या लोकांनो आज पैशाची कामे वेळेवर होऊन आर्थिक स्थिती चांगली राहील, नोकरीत अधिकाराच्या जागा मिळतील.

 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा