मुंबई – राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेवर अनेकांनी शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी यांनी देखील गंभीर आरोप केला आहे. विमान अपघातावेळी तिथं धुकं नव्हतं तर धोका होता, त्यामुळं अजित दादांचा १०० टक्के घात झाला. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
बारामतीत २८ जानेवारी २०२६ च्या सकाळच्या सुमारास विमान अपघात झाला. या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचां विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. अजित पवारांसह पिंकी माळी, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांच्या देखील मृत्यू झाला. यावर अनेकांनी शंका उपस्थित केल्यानंतर आता अजित पवार गटाचेच आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा आरोप आहे.
त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
विमान अपघातावेळी तिथं धुकं नव्हतं तर धोका होता, त्यामुळं अजित दादांचा 100 टक्के घात झाल्याचे ते म्हणालेये. जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत लढा देणार, आणि सर्व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही मिटकरी म्हणालेये. कारण, आज माझं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. लवकरच अजितदादानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठेपायी त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेणार आहे. यासंदर्भात मे महिन्यात भूमिका जाहीर करणार असल्याचेही मिटकरी म्हणाले.
अजित पवारांच्यानिधनानंतर पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक पोस्ट लिहून पाच प्रश्नांनी लक्ष देखील वेधलं आहे. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहली आहे. ज्यामध्ये म्हटलंय की बुधवारी 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान क्रॅश झाले आणि यामध्ये त्याच्या 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. मात्र ती सहावी व्यक्ती कुठे आहे? असा सवाल काल आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले कि विमान अपघातावेळी तिथं धुकं नव्हतं तर धोका होता, त्यामुळं अजित दादांचा १०० टक्के घात झाल्याचे ते म्हणाले.
जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत लढा देणार, आणि सर्व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही मिटकरी म्हणाले. ते पुढे म्हणाले कि आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. आज माझं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. लवकरच अजितदादानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या निष्ठेपायी त्यांना समर्पित करण्याचा घेणार निर्णय आहे. यासंदर्भात मे’ महिन्यात भूमिका जाहीर करणार असल्याचे मिटकरी म्हणाले.
गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात मृतदेहच का सापडले?, सहावी व्यक्ती कुठे गेली?, टेक अँड ऑफ आधी प्रवासी यादी डीजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का?, एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?, एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? अशा प्रश्नांचा भडीमार आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.




