मुंबई – मुंबई-पुणे रोडवर ३२ तास वाहतूक बंद असताना, ज्या प्रवाशांकडून टोल वसूल केला तो भाजपा सरकारने परत दिला पाहिजे, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्या प्रवाशांकडून वाहतूक बंद असताना टोल वसूल केला गेला तो बेकायदेशीर आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक ३२ तास ठप्प होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. व राज्यातील भाजपा सरकारविरोधात जोरदार टीका केली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक अखेर ३२ तासांनंतर सुरू झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून नव्वदच्या दशकात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्यात आला होता. त्या एक्स्प्रेसवेच्या वेगाला एका अपघाताने ब्रेक लागला होता. अखेर ३२ तासांनंतर मध्यरात्री २ वाजता पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरू झाली. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत, राज्यातील भाजपा सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद असल्यामूळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. आणि यानंतर नेहमीप्रमाणे राज्यातील भाजपा सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेते का? हा मोठा गंभीर प्रश्न आहे, असे मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत. ३ फेब्रुवारी २०२६ ला संध्याकाळी गॅसचा टँकर उलटला होता. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल, याचा कृती आराखडा राज्यातील भाजपा प्रशासनाकडे तयार होता का?, असा प्रश्न राज ठाकरेंनी भाजपा सरकारला विचारला आहे.
देशातील भाजपा सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा करतात. पहिले मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. हा पुणे-मुंबई महामार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष झाली आहेत. पण या काळात काय काय महामार्गावर आपत्ती येऊ शकते , याचा विचार सरकारने केला आहे का?ा राज्यात संपूर्ण रस्ता चांगल्या दर्जाचा होतो हे पाहिले. मधल्या काळात टोल वसुली केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलचे आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबती नव्हते. तर राज्यातील सरकार जर टोल घेत आहे तर मग सरकार व टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते? याबद्दलच आंदोलन केले होते. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न निर्माण झाला आहे आहे की, राज्यात एवढा मोठा रस्ता बांधला आणि टोल वसुल केला. हीच सरकारची जबाबदारी आहे का? अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली आहे. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास तर सुरळीत करा.
सध्या मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल? याबद्दल राज्यातील कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची मोठी शहरे आहेत. आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे सरकारने बघायचे नाही.मग राज्यातील सरकार काय फक्त टोल वसूल करत आहे का? राज्यांतील घेतलेला टोल परत करा, असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपा सरकारला दिला आहे. राज्यात पुणे-मुंबई रोड ३२ तास बंद असताना सरकारने ज्या प्रवाशांकडून टोल वसूल केला आहे, तो राज्यातील भाजपा सरकारने त्यांना परत दिला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज्यातील भाजपा सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहेत. तर राज्यातील भाजपा सरकारने राज्यातील नागरिकांवर अशी परिस्थिती का येत आहे याचा आधी विचार करावा, आणि प्रवाशांचा घेतलेला टोल परत करावा, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारला दिला आहे.




