पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून होणार्या शिक्षणाच्या धार्मिकतेला आमचा विरोध; संभाजी ब्रिगेड प्रवक्ते संतोष शिंदे

SHARE:

पुणे – विद्यापीठाच्या माध्यमातून होणार्या शिक्षणाच्या धार्मिकतेला आमचा विरोध आहे, असे संभाजी ब्रिगेड प्रवक्ते संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.राज्यातील नाशिकच्या कुंभमेळा संदर्भात पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. राज्यातील विद्यापीठे ही काय आरएसएसचा अड्डा आहेत का? राज्यामध्ये भाजपा सरकारकडून चुकीच्या पध्दतीने राज्यकारभार चालला आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना साधू बनवायचे आहे का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने राज्यातील भाजपा सरकारला व पुणे विद्यापीठ प्रशासनाला विचारला आहे. भारतातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एका नव्या वादात सापडले आहे.

राज्यात नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या निर्णय चुकीचा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्यातील नाशिकच्या कुंभमेळ्यात सेवा देणाऱ्या विद्यार्थांना दोन ग्रेड मार्क देण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता भीम आर्मी पाठोपाठ संभाजी ब्रिगेडनेही पुण्यातील विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे विद्यापीठाचा हा निर्णय वादात सापडला आहे. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नाशिकच्या कुंभमेळ्यातील श्रमदानाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. संभाजी ब्रिगेड या संघटनेची भूमिका प्रवक्ते संतोष शिंदे यांनी मांडली आहे.

राज्यातील क्षिक्षणक्षेत्रातील विद्यापीठे ही काय आरएसएसचा अड्डा आहेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गुणांसाठी नाशिकच्या कुंभमेळ्यात पाठवणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाला सर्व विद्यार्थ्यांना साधू बनवायच आहे का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने विचारला आहे. आरएसएसच्या डोक्यातील कल्पना राज्यातील विद्यापीठाच्या माध्यमातून राबवली जात असेल तर आमचा विरोध आहे. तर ही घटना आणि पुणे विद्यापीठाचा निर्णय अत्यंत चुकीचा व निषेध करणारा आहे. आम्ही विद्यापीठाच्या निर्णयाचा निषेध करत आहे.

राज्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून चुकीचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणतेही विद्यापीठ किंवा महाविद्यालय शैक्षणिक संस्था ही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. राज्यातील सगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना तिथे शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. असे असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये असा चुकीचा निर्णय घेऊन राज्यामध्ये चुकीचा संदेश दिला जात आहे, संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. पुणे विद्यापीठाने हा निर्णय मागे घ्यावा.

ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सत्यशोधक विचार अंगीकारुन विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणाची चळवळ सुरु केली. त्यामूळे राज्यातील विद्यापीठे ही धर्मनिरपेक्ष विद्यापीठे असली पाहिजेत. राज्यात कोणत्याही जातीला, धर्माला किंवा जातीयवादाला विनाकारण स्थान देऊ नये. तर विद्यापीठामध्ये सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात. तुमच्या दोन मार्कासाठी त्यांच्या डोक्यात विनाकारण चुकीच्या गोष्टी भरु नयेत, अशी संभाजी ब्रिगेडने मागणी केली आहे. मात्र राज्यातील विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षणाच्या धार्मिकपणाच्या खेळाला आमचा विरोध आहे. हा निर्णय मागे घेतला नाही तर, आम्ही आंदोलन करणार, आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा