अमरावती महानगर पालिकेच्या महापौर पदी भाजपा चे श्रीचंद तेजवानी तर उपमहापौर पदी युवा स्वाभिमान चे सचिन भेंडे यांची निवड

SHARE:

अमरावती – महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक दि.६ फेब्रुवारी रोजी पार पडली. भारतीय जनता पार्टी व आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान च्या युती मधे भाजपा चे श्रीचंद तेजवानी यांची महापौर पदी तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक सचिन भेंडे यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली.

सव्वा-सव्वा वर्षाचे महापौर पद हे जातींचे समीकरण लक्षात घेता ठरवण्यात आले आहे. पहिले सव्वा वर्ष सिंधी समाजातून श्रीचंद तेजवानी यांना देण्यात आले तर दुसरे सव्वा वर्ष मराठा समीकरण जुडवण्यासाठी दुसऱ्यांदा निवडून आलेले आशिष अतकरे यांना देण्यात येणार आहे.

त्याच प्रमाणे उपमहापौर पद सुद्धा सव्वा-सव्वा वर्षात विभागले गेले आहे. पहिले सव्वा वर्ष सचिन भेंडे तर दुसरे सव्वा वर्ष हे नाना आमले यांना देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे सचिन भेंडे हे पहिल्यांदाच सभागृहात जाणार असून भाजपा चे वरिष्ट नेते तुषार भारतीय यांना हरवून ते नगरसेवक झालेले आहेत. आमदार रवी राणा यांचे निकटवर्तीय असलेले सचिन भेंडे यांनी तुषार भारतीय यांना हरवून अमरावती शहरात इतिहास नोंदवला आहे. त्यामुळे त्यांना प्रथम उपमहापौर होण्याचा मान देण्यात आला. त्याच बरोबर महापौर श्रीचंद तेजवानी हे सिंधी समाजातून प्रथम महापौर असल्यामुळे संपूर्ण सिंधी समाजात आनंदाची लाट आहे.

एमआयएम च्या नगरसेविकेने केले भाजप च्या महापौर ला मतदान

अमरावती महानगर पालिका महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएम च्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपा चे महापौर पदाचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना मत दिले. पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केल्याने एमआयएम पक्षातून त्यांना तातडीने निष्काशीत करण्यात आले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा