मुंबई – राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. तर मुंबई महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णाच्या नाश्त्यात उंदराच्या लेंड्या सापडल्या आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. राज्यात सरकारच्या दूर्लक्षामूळे, राज्यातील सरकारी दवाखान्यात रुग्णाच्या नाश्त्यात उंदराच्या लेंड्या मिळाल्या आहेत. हा प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईत आरोग्य व्यवस्था अतिशय कोलमडलेली दिसत आहे. मुंबईमध्ये कांदिवलीत अतिशय धक्कादायक प्रकार समोर घडला आहे. शताब्दी रुग्णालयात एका रुग्णाच्या जेवणात उंदराची विष्ठा सापडली आहे.
मुंबई महापालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेला देण्यात आलेल्या सकाळच्या नाश्त्यात, उंदराची विष्ठा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राज्यातील सरकारी दवाखन्यातील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये कांदिवलीतील चारकोप परिसरातील एक महिला प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल झाली होती.
सकाळी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये उंदराची विष्ठा असल्याचे महिलेच्या आणि तिच्या नातेवाइकांच्या लक्षात आले. हा गंभीर प्रकार पाहून नातेवाइकांनी तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली आहे. रूग्णाच्या नातेवाइकांनी आरोप केला आहे की, एवढी मोठी चूक समोर आणूनही सरकारी रुग्णालय प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय एका प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला दिलेल्या नाश्त्यामध्ये उंदराची विष्ठा सापडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही महिला कांदिवलीतील चारकोप परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. राज्यातील सार्वजनिक सरकारी रुग्णालयातील अस्वच्छता आणि अन्नाच्या दर्जा या घटनेमुळे, मुंबईतील कांदिवली परिसरातील नागरिकांनी सरकारच्या विरोधात व राज्यातील सरकारी आरोग्य खात्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.




