जगभरात पहिल्यांदाच नदीतून महात्सुनामी येणार, भारतासह इतर देशातील 93 लाख लोकांचा जीव धोक्यात; आयआयटी रुरकी संशोधन अहवालातून माहिती समोर

SHARE:

नवी दिल्ली – जगभरात पहिल्यांदाच नदीतून महात्सुनामी येणार आहे, तर भारतासह इतर देशातील ९३ लाख लोकांचा जीव धोक्यात आहे, असे आयआयटी रुरकी संशोधन अहवालात म्हटले आहे. भारत देशात ही हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये त्सुनामीसारखी धोकादायक आपत्ती निर्माण होत आहे. आयआयटी रुरकी येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारत देशात ही हिमालयीन पर्वतांमध्ये हिमनदी तलावांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

जगभरात त्सुनामीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे मोठा विनाश झाला आहे. जगात पहिल्यांदाच नदीतून महात्सुनामी येणार आहेत. भारतातील हिमालयाच्या शिखरांवरील बर्फ आता जीवनदायी नद्यांऐवजी हिमनदी त्सुनामीचा धोका बनला आहे. भारतासह इतर देशातील ९३ लाख लोकांचा जीव धोक्यात आहे.

हिमालयीन प्रदेशातील हिमनदी तलावांचे क्षेत्रफळ ५.५ टक्केने वाढले आहे. या ३१, हजारहून अधिक अस्थिर तलावांमुळे जगभरातील ९३ लाख लोकांना ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लडचा धोका निर्माण झाला आहे. एकट्या भारतात, ३०  लाख लोक या तलावांजवळ राहतात. जगभरातील शास्त्रज्ञांनी उपग्रह डेटा वापरून इशारा दिला आहे की, जागतिक पातळीवर तापमानवाढीमुळे केदारनाथसारखी आपत्ती भारतात पुन्हा येऊ शकते.

सायंटिफिक रिपोर्टमध्ये या हिमालयीन त्सुनामीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. आयआयटी रूरकी संशोधन अहवालानुसार, २०१६ ते २०२४  मध्ये हाय माउंटन आशिया प्रदेशातील या तलावांचे क्षेत्रफळ ५.५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. जगभरात सध्या, असे अस्थिर ३१ , हजारहून अधिक तलाव आहेत. यामुळे ९३ लाख लोकांसाठी धोका निर्माण झाला आहे.

जगभरात जेव्हा पर्वतांमधील हिमनद्या वितळतात तेव्हा ,त्यांचे पाणी पोकळीत जमा होते आणि तलाव तयार होतात. हे तलाव कायमस्वरूपी धरणांनी वेढलेले नसून, सैल खडक, बर्फ आणि ढिगाऱ्यांच्या नैसर्गिक धरणांनी वेढलेले असतात. जेव्हा जागतिक तापमानवाढीमुळे पाण्याचा दाब वाढतो किंवा, हिमस्खलन या तलावांवर येते तेव्हा हे धरणे फुग्यांसारखे फुटतात. याला ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड किंवा हिमालयीन त्सुनामी म्हणतात. भारतातील २०१३  मधील केदारनाथ दुर्घटना आणि २०२३  मधील सिक्कीम पूर ही या धोक्याची प्रमुख उदाहरणे आहेत.

जगभरात हे तलाव इतक्या उंचीवर आहेत की जेव्हा, त्यांचे पाणी खाली येते तेव्हा ते प्रचंड वेगाने खाली येते. ते फक्त पाणी वाहून नेत नाही तर एक हलणारा पर्वत बनते, जो दगड, माती आणि झाडे सोबत घेऊन जातो आणि त्याच्या मार्गातील सर्व काही नष्ट करतो. या सुनामीमूळे जगभरातील भारत देशासह इतर देशात ही मोठे नुकसान होऊ शकते. व भारतात हिमालयांतील डोंगर दर्यांमध्ये व मोठ्या पर्वतांमध्ये हिमनद्यांपासून तलाव तयार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असे आयआयटी रूरकी संशोधन अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा