फरिदाबाद – हरियाणामध्ये सूरजकुंड मेळ्यात मोठा अपघात झाला आहे. तर या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. हरियाण राज्यामध्ये सूरजकुंड मेळ्यामध्ये एक झूला खाली पडल्याने मोठा अपघात झाला आहे. बचावासाठी गेलेल्या एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. १३ जण जखमी झाले आहे. हरियाणा राज्यातील फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात ही घटना घडली आहे. मेळ्यातील एक मोठा झुला अचानक खाली पडल्याने मोठा अपघात होऊन यात लोक जखमी झाले आहेत.
हरियाणाच्या फरिदाबादमधील या अपघातात झुल्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी पोहोचलेल्या एका पोलीस निरीक्षकासह १० हुन अधिक लोक जखमी झाले. आहेत. जखमी पोलिस निरीक्षकाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पलवल येथे तैनात असलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचा बचाव कार्यात मृत्यू झाला आहे. पोलिस उपायुक्त आयुष सिंह यांनी सांगितले की, या अपघातात एकूण १३ लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी ६ वाजता हा झुला अचानक खाली पडला आहे. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा उपायुक्त, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातानंतर फरिदाबाद व पलवल परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी फूड कोर्टमध्ये एक मोठा दरवाजा पडल्यामूळे अपघात झाला होता,. ज्यामध्ये २ लोक जखमी झाले होते. हरियाणा राज्यातील सूरजकुंड मेळ्यात एकाच दिवशी २ अपघात झाले आहेत. शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सूरजकुंड मेळ्यात २ अपघातांची नोंद झाली आहे. त्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.
पहिला अपघात मोठे गेट खली पडल्याने झाला आहे. तर दुसरा त्सुनामी झुला अचानक पडल्याने अपघात झाला आहे. या दोन्ही अपघातांमुळे हरियाणातील फरिदाबादमधील जत्रा समिती आणि आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्या अपघातात एका मुलाला दुखापत झाली आहे. तर एका तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. फरिदाबादमधील या जत्रेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. अचानक झूला खाली पडल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.
हरियाणा राज्यातील प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे, आणि फरिदाबादमधील या घटनेची चौकशी सुरू आहे. फरिदाबादमधील या मोठ्या अपघातानंतर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक बचाव पथके तैनात केली आहेत. झूल्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठ बचाव पथकाकडून प्रयत्न केले जात आहेत.
फरिदाबाद व पलवल पोलिसांनी लोकांना घटनास्थळावरून दूर जाण्याचे आदेश दिले आहेत. फरिदाबाद पोलिस प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे. हरियाणा प्रशासनाने आयोजकांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या फरिदाबाद अपघाताच्या घटनेत दोषी असणार्यावर कडक कारवाई केली जाणार आहे, असे हरियाणा राज्यसरकारने म्हटले आहे. या अपघात प्रकरणात अधिक तपास फरिदाबाद पोलिस करत आहेत.




