नवी दिल्ली – जगभरातील आयटी क्षेत्रातील लाखो लोकांच्या नोकर्या जाणार आहेत, तर एआय तंत्रज्ञानाच्या वापरामूळे भारताच्या आयटी क्षेत्रात व शेअर मार्केटवरही परिणाम झाला आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामूळे भारताच्या आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ज्रगभरातील आयटी क्षेत्रातील लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर संकट येणार आहे. २४ तासांत भारत देशातील शेअरमार्केट ढासळले आहे. करोडो रुपयांचा चुराडा झाला आहे. शेअर मार्केटमधील लोकांचे नुकसान झाले आहे. जगभरात दिवसेंदिवस एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
एका एआय तंत्रज्ञानामूळे जगभरातील लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला आहे. २४ तासांत करोडो रुपयांचा चुराडा झाला आहे. यामुळे भारताच्या आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. निफ्टी आयटी निर्देशांकात ६ टक्केची घसरण झाली आहे.तर आयटी कंपन्यांच्या करोडो रुपयांचे नूकसान झाले आहे. अद्यापही जगभरातील शेअर बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.
जगभरात व भारतातही मार्च २०२० मध्ये कोविड क्रॅश झाल्यानंतर आयटी क्षेत्रात सर्वात मोठी घसरण झाली होती. तेव्हा निर्देशांक ९.६ टक्केने घसरला होता. ४ फेबु्रवारी २०२६ बुधवारी झालेल्या व्यवहारात आयटी कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २९.८५ लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे. हे अमेरिकन एआय स्टार्टअप अँथ्रोपिकने लाँच केलेल्या नवीन साधनांमुळे झाले आहे. अमेरिकेतील सॉफ्टवेअर स्टॉकमध्ये अचानक मोठी घसरण झाल्यामुळे भारतीय आयटी क्षेत्रात ही शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आहे. अमेरिकन एआय स्टार्टअप अँथ्रोपिकने ११ नवीन प्लगइन्स लाँच केले आहेत. हे प्लगइन्स विविध व्यावसायिक कामे स्वयंचलित करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यामुळे एआय तंत्रज्ञान आयटी कंपन्यांच्या नफ्याला आणि बाजारातील वर्चस्वाला कमकुवत करू शकते अशी भीती पुन्हा जागृत झाली आहे. या आयटी तंत्रज्ञानाच्या साधनामुळे , वापरामूळे अमेरिकन एआय स्टॉकमध्येही घसरण झाली आहे.
एआय तंत्रज्ञानातील हे अँथ्रोपिकचे नवीन टूल, क्लाउड कोवर्क, हे फक्त एक चॅटबॉट नाही तर ते तुमच्या संगणकावर काम करू शकणार्या एका साथीदारासारखे आहे. ते फायली वाचू शकते, कागदपत्रे संपादित करू शकते, नवीन फायली तयार करू शकते, फोल्डर्सचे नाव बदलू शकते आणि त्यांना व्यवस्थित करू शकते. ते स्क्रीनशॉटवरून स्प्रेडशीट तयार करू शकते आणि रफ नोटसचे रिपोटर्स किंवा ड्राफ्टमध्ये रूपांतर करू शकते. लेखक, विश्लेषक, पत्रकार, विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी हे वापरू शकतात. क्लाउड लीगल अँड डेटा हे एक साधन आहे जे, वकील, कंपन्या आणि विश्लेषकांसाठी मोठ्या कायदेशीर आणि व्यावसायिक कागदपत्रांसह काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ते आता नव्यानेच जगभरातील आयटी तंत्रज्ञानाला जोडले गेले आहे.
यामूळे जगभरातील आयटी क्षेत्रातील चिंता वाढली आहे. नवीन आलेल्या अँथ्रोपिकने एआय तंत्रज्ञान टुलने स्पष्ट केले आहे की, हे एक सॉफ्टवेअर पर्याय नाही, तर पुनरावृत्ती होणारी कामे हाताळण्यासाठी एक डिजिटल सहाय्यक आहे. तरीही, काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे हाताळण्याची त्याची क्षमता आहे. त्यामूळे आयटी क्षेत्रात चिंता निर्माण झाली आहे. जगभरातील कायदेशीर, आर्थिक आणि कॉर्पोरेट प्रशासनाचे काही भाग कमी किंवा कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एआय तंत्रज्ञानाने हाताळले जाऊ शकतात, त्यामूळे भारतीय आयटी शेअर्समध्ये घसरण झाली आहे, अमेरिकेतील आयटी क्षेत्रात ही घसरण झाली आहे. याचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर झाला आहे. आणि जगभरातील आयटी क्षेत्रातील लोकांना एआय या तंत्रज्ञानाच्या जास्त वापरामूळे नोकर्या जाण्याचे संकट आहे.
जगभरातील विक्रीच्या अनुषंगाने आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, एचसीएलटेक, टेक महिंद्रा आणि विप्रो या आयटी कंपन्यांतील शेअर्सचे भाव ६ टक्केपर्यंत घसरले आहे. इन्फोसिस आणि एमफासिसच्या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला आहे. दोन्ही ७ टक्के पेक्षा जास्त घसरले आहेत. एलटीआयमाइंडट्री, विप्रो, कोफोर्ज, टीसीएस, एमफासिस आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये ५ ते ६ टक्के घसरण झाली आहे. विप्रोच्या शेअर्समध्ये जवळपास ४ टक्के घसरण झाली आहे. निफ्टी आयटी इंडेक्सच्या शेअर्सचे एकत्रित बाजारमूल्य १.९ लाख कोटी रुपयांनी घसरून सुमारे ३० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
जगभरात कायदेशीर सॉफ्टवेअर, व्यावसायिक विश्लेषण आणि डेटा सेवा विकणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. यामुळे अमेरिकन शेअर्सही घसरले. त्यामूळे जगभरातील आयटी क्षेत्रातील लोकांना एआय तंत्रज्ञानाच्या अधिक वापरामूळे नोकर्या जाण्याची चिंता आहे. व जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात काम करणार्या लाखो कामगारांच्या नोकर्या आता धोक्यात आल्या आहेत.




