अजितदादांच्या पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं? आमदार अमोल मिटकरी यांचा प्रश्न

SHARE:

अकोला – अजित पवार यांच्या विमान अपघातावरून शंका वाढतच चालली आहे. आता पुन्हा एकदा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी आणखी एक संशयाचा अँगल उपस्थित केलाय. अजितदादांच्या विमानाच्या पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं कां? कारण, पायलेटने ‘मेडे’ कॉल दिला नाही. टेकऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं, मात्र, तेही त्याने केलं नव्हतं. त्यामुळं आम्हाला व्हीआरएस कंपनीवर मोठी शंका आहे. ५० कोटींचा विमा काढून हे कृत्य करायला लावलं कां? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.

व्हीआरएस कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले. ती कंपनी आधीच नादुरूस्त होती, वर्षांभरापासून कंपनीवर बंदी होती. आणि तेच विमान अजितदादांसाठी २८ तारखेला दिल्या गेले. दुसरीकडं, डिसेंबर २०२५ च्या महिन्यात व्हीआरएस कंपनीने प्रत्येक पायलटचा ५० कोटी रुपयाचा विमा उतरवलाय. जर ५० कोटींचा विमा उतरवल्या गेला असेल आणि जो पायलट वेळेवर बदलला गेला, त्याला हिप्नोटाइज केल होते का?, त्याला आमिष दाखवलं होत कां? कारण त्याने ‘मेडे’ कॉल दिला नाही, असा संशय मिटकरींनी उपस्थित केला.
याशिवाय खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी थेट प्रश्न विचारला आहे की अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? आणि सखोल आणि स्वतंत्र चौकशी न करता सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे का? बॉम्बचा अँगल समोर आल्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले की सर्व पैलूंची पारदर्शक चौकशी होईपर्यंत हे प्रकरण बंद करू नये.

पत्रकार परिषदेत खासदार सोनवणे यांनी स्पष्टपणे प्रश्न उपस्थित केला की, विमानात एकूण सहा लोक असताना अपघातानंतर फक्त पाच मृतदेह का सापडले. अजित पवार यांच्या घरातून निघण्याच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळ कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डिंग आणि घटनेच्या सकाळपासून ते अपघात होईपर्यंतचे सर्व फुटेज सार्वजनिक करावेत. शिवाय, वैमानिकाची ओळख, त्याची भूमिका आणि उड्डाणातील तांत्रिक बाबींचीही चौकशी करावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.

अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी करण्याची मागणीही खासदार सोनवणे यांनी केली. विमान कोसळले तर हवेतच त्याचा स्फोट का झाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नांसह, त्यांनी अपघाताची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन केले, जेणेकरून सत्य समोर येईल आणि कोणत्याही शंका कायमच्या दूर होतील.

रोहित पवार म्हणाले की ९ फेब्रुवारीनंतर विमानात प्रत्यक्षात काय घडले हे ते स्पष्ट करतील. त्यांनी दावा केला की आम्हाला काही माहिती मिळाली आहे आणि आम्ही अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. सत्य बाहेर आणणे महत्त्वाचे आहे. आम्ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून माहिती मिळवू. दादांच्या अपघाताबाबतचे संपूर्ण सत्य ९  फेब्रुवारी रोजी उघड होईल. त्यांच्या दाव्याने ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांचे विधान भाजप आणि राज्यातील महायुती सरकारविरुद्ध थेट राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा