धुळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्याला ८ लाखांची लाच घेताना अटक; विद्युत ठेकेदारकडून लाच घेतांना झाली कार्यवाही

SHARE:

धुळे – धुळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्याला ८ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ८  लाखांची लाच घेताना उपअभियंत्याला अटक केली आहे. ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी पैसे मागितले होते.
धुळे लाचलुचपत विभागाने नितीन इंगळे याला विद्युत ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना अटक केली आहे.

धुळ्यामध्ये विद्युत ठेकेदाराकडून बिलाच्या मोबदल्यात ८.५० लाख रुपयांची लाच मागून तडजोडी अंती ८  लाख रुपये स्वीकारले आहेत. तर या उपअभियंत्याला लाच घेणे महागात पडले आहे. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत उपविभागाचा उपअभियंता नितीन इंगळे याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना अटक केली आहे. ही कारवाई धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी करण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हा शासकीय नोंदणीकृत विद्युत ठेकेदार आहे. त्याने शासनाच्या विविध विद्युत कामांचे ठेके घेतले होते. संबंधित प्रकरणात बिल अदा करण्याच्या बदल्यात नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत उपविभागाचा उपअभियंता नितीन इंगळे यांनी लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. या ठेकेदाराला २८ गावांतील सोलर स्ट्रीट लाईट कामाचा ठेका देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील २८ गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम तक्रारदारांच्या कंपनीला मंजूर झाले होते.

जीएसटी वगळता २  कोटी ३७ लाख २९ हजार ३३५६ रुपयांची कामे मंजूर होऊन कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. संबंधित कामे मुदतीत पूर्ण करण्यात आली आहेत. मार्च २०२५  मध्ये ४१  लाख रुपयांचे बिल देण्यात आले होते. त्या वेळी उपअभियंता नितीन इंगळे याने ८० हजार रुपये घेऊन बाकीची रक्कम पुढील बिलावेळी देण्याची मागणी केल्याचा आरोप उपअभियंत्यावर करण्यात आला आहे. याच सरकारी अधिकार्यांकडून पुढील बिलासाठी ८.५० लाखांची मागणी केली होती. डिसेंबर २०२५ मध्ये बाकीच्या कामाचे २  कोटी २ लाख ५ हजार ५२५ रुपये तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

त्यानंतर उपअभियंत्याने बिल देण्याच्या मोबदल्यात 8 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअभियंत्याला 8 लाख रुपये स्वीकारताना अटक केले आहे. याप्रकरणात धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभाग उपअथीयंता नितीन इंगळे याच्यावर कडक कारवाई करण्यात आल्याने , राज्यातील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार किती वाढला आहे, हे पाहायला मिळत आहे. राज्यातील सरकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी लोकांचा मनमानी कारभार समोर आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा