मुंबई – महाराष्ट्र राज्यातील झोपडपट्टयांमध्ये जाऊन मुलांना शिकवणार्या महिलेला दुबईमध्ये शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. मुंबईकर महिला शिक्षिकेला हा पुरस्कार दुबईमधील राजा क्राऊन प्रिन्स शेख यांनी स्वतः दिला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिक्षिकेचे कौतुक केले आहे. ९ कोटी रुपयांचा हा पुरस्कार मुंबईतील महिलेला मिळाला आहे. मुंबईकर शिक्षिकेचा दुबईच्या राजाकडून सत्कार करण्यात आला आहे. पण या शिक्षिकेची ५००० हजार शिक्षकांमधून निवड करण्यात आली होती.
शिक्षक पुरस्कार देण्यात आलेल्या एका पुरस्काराची रक्कम ९ कोटी रुपये इतकी आहे. हा पुरस्कार मुंबईतील एका शिक्षिकेला मिळाला आहे. जगभरातील १३९ देशांतील ५००० शिक्षकांमधून या शिक्षिकेची निवड करण्यात आली होती. मुंबईत झोपडपट्टयांमध्ये जाऊन मुलांना शिकवण्याचा ध्यास घेतलेल्या मुंबईकर महिला शिक्षिकेला हा पुरस्कार दुबईमधील क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांनी स्वतः दिला आहे. या महिला शिक्षिकेचे नाव रूबल नागी असे आहे. तर त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे जेम्स एज्युकेशन ग्लोबल टीचर पुरस्कार असे नाव आहे.
हा पुरस्कार जिंकणाऱ्या शिक्षकाला १० लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाते. मुंबईकर रुबल नागी यांची निवड जगभरातील १३९ देशांतील ५००० शिक्षकांमधून करण्यात आली आहे. वर्ल्ड गव्हर्मेंट समिटच्या शेवटच्या दिवशी रूबल नागी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. रूबल नागी या मिसाल इंडिया मोहिमेच्या माध्यमातून लाखो मुलांपर्यंत शिक्षणाच्या संधी घेऊन पोहचल्या आहेत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रूबल नागी यांनी म्हटले आहे की, हा पुरस्कार मी गेल्या २४ वर्षात केलेल्या परिश्रमाचे फळ आहे. रोज सकाळी उठून दूर्गम भागातील झोपडपट्टयांमध्ये जावून मुलांना शिकवणे आणि त्यांच्याकडून शिकणे हे माझे एकमेव लक्ष्य होते. झोपडपट्टयांमधील मुलांचे शिक्षण खंडीत होता कामा नये. भारतातील प्रत्येक मुलाला शाळेत पाहणे हे माझे स्वप्न आहे, असे रूबल नागी यांनी म्हटले आहे.
रूबल नागी यांनी मिसाल इंडिया या योजनेबद्दलही माहिती दिली आहे. देशातील १०० पेक्षा जास्त झोपडपट्टया आणि अनेक गावांमध्ये मिसाल इंडियाच्या माध्यमातून १० लाख मुलांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचा उद्देश साध्य करण्यात आला आहे. या मुलांना कमीत कमी खर्चामध्ये शिक्षण देण्यात आले आहे. मुलांचे अंकज्ञान, मूलभूत जीवन कौशल्ये आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर या मोहिमेच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे, असे रूबल नागी यांनी म्हटले आहे. देशभरात राबवण्यात आलेल्या मिसाल इंडिया मोहिमेच्या माध्यमातून झोपट्टयांमधील १ लाख ५५ हजारांहून अधिक घरांची रंगरंगोटी करुन देण्यात आली आहे.
तसेच या झोपडपट्टयांमध्ये मुलांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमा राबवून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वर्की फाउंडेशन आणि युनेस्को यांच्या सहयोगाने ग्लोबल टीचर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी आतापर्यंत १ लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले होते. जगभरातील १३९ देशातील ५ हजार शिक्षकांमधून रूबल नागी यांना हा ९ कोटीचा शिक्षक पुरस्कार दुबईमध्ये देण्यात आला आहे.




