राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीला सुरूवात, जागा कमी आहे तरी अर्जदारांची संख्या जास्त प्रमाणावर

SHARE:

मुंबई – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीला सुरूवात झाली आहे, तर पोलिस भरतीच्या जागा कमी आहे तरी अर्जदारांची संख्या जास्त प्रमाणावर वाढली आहे, असे राज्यातील पोलिस विभागाने म्हटले आहे. राज्यात पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. राज्यात हिंगोली जिल्ह्यात ६४ पदांसाठी १३६०० अर्ज आले आहेत, बीडमध्ये १७४ जागांसाठी ८१३४ अर्ज, तर अमरावतीत २१४ जागेसाठी २२ हजार अर्ज आले आहेत. राज्यातील पोलिस भरती प्रक्रियेत उंची आणि छाती मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर प्रथमच केला जाणार आहे. पोलिस भरती मैदानी चाचणीत अचूक मोजणी होणार आहे. तर पोलिस भरतीला आलेल्या उमेदवारांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंका उपस्थित होणार नाही, याची दक्षता राज्यातील पोलिस खाते घेणार आहे.

आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीला सुरूवात झाली आहे. राज्यातील पोलिस भरतीच्या जागा कमी असल्या तरी अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, असे चित्र दिसत आहे. आता राज्यातील काही जिल्ह्यात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात पोलिस भरतीच्या ६४ जागांसाठी १३६०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत, राज्यात मार्च २०२६ पर्यंत ही पोलिस भरती प्रक्रिया चालणार आहे. राज्यातील ही सर्व पोलिस भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केली जाणार आहे. राज्यातील पोलिस भरतीला आलेल्या उमेदवारांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नये, असे राज्यातील पोलिस विभागाने म्हटले आहे.

राज्यात जळगाव मध्ये पोलिस भरतीच्या १७१ जागांसाठी १२,०००  उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.अमरावती ग्रामीणमधील २१४ पदांसाठी २२ हजार अर्ज आले आहेत, बीडमध्ये १७४ जागांसाठी ८१३४ उमेदवार भरतीसाठी मैदानात उतरणार आहेत. वाशिममध्ये ४८ जागांसाठी ९९२६ अर्ज आले आहेत. राज्यात या पोलिस भरतीत सर्व उमेदवारातून योग्य उमेदवार निवडताना पोलिस यंत्रणेचा ही कस लागणार आहे. राज्यातील या पोलिस भरती प्रक्रियेत कोणताही गैर व्यवहार होणार नाही. पोलिस विभागाने ठिकठिकाणी कॅमेरे लावले आहेत. प्रत्येक पोलिस भरती उमेदवाराच्या कामगिरीवर कॅमेऱ्याद्वारे नोंद केली जाणार आहे. या पोलिस भरती साठी राज्यातील पोलिस विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अर्जाच्या जास्त संख्येमुळे ही राज्यातील ही पोलिस भरती प्रक्रिया चोख नियोजनात पार पडणार आहे. राज्यात या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध झाली आहेत, असे राज्यातील पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा