राज्यात एसटी प्रवासासाठी डिजिटल स्मार्ट कार्डची सेवा लागू होणार, सामाजिक सवलतींच्या लाभासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक

SHARE:

मुंबई – राज्यात एसटी प्रवासासाठी डिजिटल स्मार्ट कार्डची सेवा लागू होणार, सामाजिक सवलतींच्या लाभासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हटले आहे. राज्यात आता एस.टी. प्रवासाला डिजिटल स्मार्ट काडाने सुरूवात होणार आहे. तर राज्यातील सवलतधारकांसाठी डिजिटल स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे, असे राज्यातील परिवहन विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या प्रवासात आता नवीन तंत्रज्ञान येणार आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच डिजिटल स्मार्ट कार्ड लागू होणार आहे. हा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्यातील एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे डिजिटल स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे.

राज्यातील एसटी खात्याची ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, राज्यातील एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांच्या विश्वासाला बळ देणारे पाऊल आहे. डिजिटल स्मार्ट कार्ड सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक आणि रोख कारभार या गोष्टी स्मार्ड कार्डमध्ये दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्यातील एसटी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंटस बँक यांच्याशी करार केला आहे. तर राज्यात लवकरच सर्व एसटी आगारांमध्ये डिजिटल स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू होणार आहे. या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील शालेय विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले डिजिटल स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिक व महिला व सर्वसाधारण प्रवाशांना आधार संलग्न हे स्मार्ट कार्ड मिळणार आहे. राज्यातील दिव्यांग प्रवाश्यांचा आधार क्रमांक जोडून सरकारी सुविधा असलेले स्मार्ट कार्ड त्यांना दिले जाणार आहे. राज्यातील पुरस्कार मिळालेले पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना, राज्यातील परिवहन विभागीय कार्यालय येथील मुख्यालय व एसटी आगारा मार्फत स्मार्ट कार्ड देणार आहे. या कार्डमूळे प्रवासाची सोय सोपी होणार आहे. नवीन स्मार्ट कार्डासाठी काही किंमत आकारली जाणार आहे, तर जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास नवीन मिळणार आहे.

या स्मार्ट कार्डसाठी रिचार्ज सुविधा असणार आहे. ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप, एजंटकडून रिचार्ज करायची सोय असणार आहे. राज्यात स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी प्रशासकीय यंत्रणा असणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3,000 हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील एस.टी.चा प्रवास सहज, सूलभ ,सोपा होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तिकीट हातात घेणे आणि सुट्या पैशांची चिंता, वादविवाद या जुन्या गोष्टी आता बंद होणार आहेत, असे राज्यातील परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा