मुंबई – राज्यात आता पीएफचे पैसे युपीआय वरून काढता येणार आहे, तर पैसे काढण्यासाठी २५ हजाराची मर्यादा असणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्यातील खासगी व सरकारी क्षेत्रातील सर्व नोकरदारांसाठी, एप्रिल २०२६ या तारखेपासून युपीआय मधून पटकन पैसे काढता येणार आहे. राज्यातील सर्व नोकरदार वर्गाला पीएफचे पैसे युपीआय वरुन काढता येणार आहेत.
आपल्या हक्काचे पैसे राज्यातील सर्व खासगी व सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता कधीही काढता येणार आहेत. राज्यात एप्रिल २०२६ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. त्याचा फायदा राज्यातील सर्व खासगी व सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता तुमच्या हक्काचे पैसे काढण्यासाठी आता, क्लेम फॉर्म भरून दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज नाही. राज्यातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या ८ कोटी सदस्यांसाठी ईपीफओ ३.० महत्त्वाचं आणि नवीन ॲप आणले आहे. एप्रिल २०२६ पर्यंत एक नवीन मोबाईल ॲप लाँच केला जाणार आहे, त्याने राज्यातील कोणताही पीएफ सदस्य युपीआय वापरून, आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात. राज्यात पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे.
नव्या नियमांनुसार, कोणताही पीएफ सदस्य आपल्या युपीआय पिनचा वापर करून लिंक केलेल्या बँक खात्यात तात्काळ पैसे पाठवू शकणार आहे. आजारपण, लग्न, शिक्षण किंवा घराच्या कामासाठी लागणारा पैसा आता ३ दिवसांत हातात येईल. हे काम स्वतः पीएफ सदस्य करु शकणार आहे. राज्यात युपीआयद्वारे पैसे काढताना एका व्यवहारासाठी २५ हजार रुपयांची मर्यादा असणार आहे. सरकारी वा खासगी निवृत्तीनंतरची सुरक्षा जपण्यासाठी तुमच्या एकूण बॅलन्सपैकी २५ टक्के हिस्सा लॉक राहणार आहे तर, बाकीचा मोठा हिस्सा तुम्ही गरजेनुसार काढू शकणार आहे. लांब क्लेम प्रोसेसऐवजी आता डिजिटल सेवांवर राज्यातील पीएफ सुविधेचे काम चालणार आहे, असे राज्य प्रशासनाने म्हटले आहे.




