राज्यात भारतीय डाक विभागातील बनावट स्टँप घोटाळा उघड, तर मुंबई पोलिसांकडून ५ आरोपींना बिहार व दिल्लीतून अटक

SHARE:

मुंबई – राज्यात भारतीय डाक विभागातील बनावट स्टँप घोटाळा उघड झाला आहे, तर या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून ५  आरोपींना बिहार व दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. राज्यात भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून विविध राज्यांत विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याने भांडाफोड केला आहे. देशात बनावट स्टँप घोटाळ्याचे पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. या घोटाळ्यात सरकारी दस्ताऐवजसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टँपमध्ये काही बदल करण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारचा स्टँप घोटाळा आजही सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्यात नकली पोस्टल स्टॅम्प बनविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी आरोपींना बिहार आणि दिल्लीतून अटक केली आहे. तसेच, आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आहे. मुंबईतील राकेश बिंद, बिहारमधील शमशोद्दीन गफार व शाहीद रजा तसेच दिल्लीतील मोहम्मद शहाबुद्दीन शेख आणि गाझियाबाद येथील विरेंदर प्रसाद, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करत होते. व या बनावट स्टॅम्पची विविध राज्यांत विक्री करत होते. या आंतरराज्यीय टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याने तपास केला आहे. या प्रकरणात लाखो रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणात १२ सप्टेंबर २०२५ रोजी आशुतोष जमादारसिंह कुमार, डाक निरीक्षक, मुंबई जी.पी.ओ. यांच्या तक्रारीवरून आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासामध्ये मुंबई जी.पी.ओ. कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या तपासात आरोपी बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून ते विविध राज्यांत पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींच्या बँक खात्यांत ७ ते ८  कोटी रुपयांची रक्कम दिसून आली आहे. मुंबई पोलिसांकडून या आरोपीवर १४ दिवस नजर ठेवण्यात आली होती. त्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या तपासात या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार दिल्ली व उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे समजताच आरोपी वारंवार मोबाईल क्रमांक व राहण्याचे ठिकाण बदलून पळून जात होते. राज्यातील मुंबई पोलीस पथकाने दिल्ली येथे १४ दिवस पाळत ठेवून आरोपींना अटक केले आहे. या आरोपीकडून एकूण २७ लाख ८४ हजार २०० रुपयांचे बनावट पोस्टल स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत. हे आरोपी देशातील विविध राज्यांत कुरिअरमार्फत हे बनावट स्टॅम्प पाठवून सरकारची फसवणूक करत होते. या प्रकरणात अधिक तपास मुंबई पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा