राज्यातील अन्न व औषध विभागातील कर्मचार्याला लाच घेताना एसीबीकडून अटक; लाचलूचपत विभागाने धाड टाकत केली मोठी कार्यवाही

SHARE:

मुंबई – राज्यातील अन्न व औषध विभागातील कर्मचाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आहे. राज्यातील अन्न व औषध विभागातील कार्यालय सील करण्यात आले आहे. यानंतर नरहरी झिरवाळ यांनी राजीनामाच्या मागणीवर वक्तव्य केले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये एसीबीकडून धाड टाकण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातील कर्मचारी राजेंद्र ढेरंगेला ३५ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आहे.

तर अन्न व औषध विभागाचे कार्यालय सील करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगेला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने पकडले आहे. परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्याने ५० हजारांची मागणी केली होती. या घटनेनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसेच आपल्याला काही राजकीय पक्षांकडून टार्गेट केले जात आहे. आपण मुंबईत गेल्यावर बैठक घेणार असून, इतर कोणी दोषी आढळले तर, त्यांच्यावरही कारवाई करणार आहे, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.

मी तर परवापासून दिल्लीत आहे. हा प्रकार चुकी़चा असून, असे व्हायला नको होते. राजेंन्द्र ढेरंगे हे आपल्याकडे क्लार्क म्हणून काम करतात. ते मूळचे अन्न, नागरी पुरवठा विभागाचे आहेत, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. या सगळ्या प्रकरणाचा अन्न प्रशासन खाते, मंत्री, मंत्र्यांचे पीए याच्याशी काही संबंध नाही. राजेंन्द्र ढेरंगे यांची कधीच तक्रार आली नव्हती असे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत. जर माझ्यापर्यंत या प्रकरणाचा तपास येणार असेल तर मी राजीनामा देणार आहे. यासंदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा झालेली नाही. मी त्यांच्याशी बोलणार आहे. मुंबईत मंत्रालयाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगेला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केले आहे.

लातूरमधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. रद्द परवाना नूतनीकरण करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्यांना असतात. त्यासंदर्भात सुनावणी घेऊन निर्णय घेतले जातात. मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे यान,े एका नागरिकाकडे लाच मागितली होती. त्याने ५० हजारांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे मदत मागितली होती. तपासात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील, लिपिक राजेंद्र ढेरंगेने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. तडजोडीअंती राजेंन्द्र ढेरंगे हा तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये घेण्यास तयार झाला होता. ३५ हजाराची लाच घेताना राजेंन्द्र ढेरंगे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंन्द्र ढेरंगे याच्यासह कार्यालयातील आणखी एकाला अटक करण्यात आले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यानुसार लाच घेतली असे त्याने सांगितले आहे. खासगी सचिव हे मंत्री कार्यालयाचे प्रमुख असतात. राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगेला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केल्यामूळे, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा