मुंबईमध्ये लोकल रेल्वेमध्ये परप्रांतीयांकडून महाराष्ट्र सुरक्षा दलातील मराठी तरूणाला बेदम मारहाण

SHARE:

मुंबई – लोकल रेल्वेमध्ये परप्रांतीयांकडून महाराष्ट्र सुरक्षा दलातील मराठी तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणात मुंबईत लोकल रेल्वेमध्ये मध्ये परप्रांतीयांनी मराठी तरूणासोबत अरेरावी व शिवीगाळ केली आहे, व त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील लोकल रेल्वेमध्ये काट डालूंगा म्हणत महाराष्ट्र सुरक्षा दलातील मराठी जवानाला मारहाण करण्यात आली आहे. धावत्या लोकलमध्ये जवानाला मारहाण केल्यामूळे मुंबईतील रेल्वे प्रवासातील लोकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणामूळे मुंबईतील सर्वसामान्य मराठी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

तर मुंबईतील रेल्वे प्रशासन काय करते आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. लोकलमधील जवानाला काट डालुंगा अशी परपांतीयांनी धमकी दिली आहे. मुंबईतील मध्य रेल्वेमार्गावरील एसी लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे. मुंबई लोकल संपूर्ण जगासाठी हा एक कुतूहलाचा विषय असला तरीही, याच लोकलने रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणी आणि प्रसंगांचा सामना करावा लागतो. लोकलमध्ये नुकतीच एक अशी घटना घडली आहे. मुंबईतील लोकलमध्ये सामान्य मराठी नागरिक कितपत सुरक्षित आहे? हाच प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.

कारण मुंबई लोकलमध्ये मराठी जवानाला परप्रांतीयांकडून मारहाण करण्यात आली आहे. माहितीनुसार मध्य रेल्वेमार्गावरील एसी लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे. ज्यामध्ये मुंबई लोकलमध्ये सुरू असणारी परप्रांतीयांची अरेरावी समोर आली आहे. मुंबईत कार्यरत असणाऱे सुरक्षा दलाचे मराठी जवान आकाश बाबर यांना ४ ते ४ परप्रांतीयांनी विक्रोळी रेल्वे स्थानकातून कल्याण लोकल मध्ये शिरत बेदम मारहाण केली आहे. या मराठी जवानाला काट डालुंगा अशी धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असणारे जवान आकाश बाबर हे नेहमीप्रमाणे कल्याण लोकलने प्रवास करत होते.

त्याचवेळी विक्रोळी ते मुंलूंड लोकल रेल्वेच्या प्रवासात ही घटना घडली आहे जिथे ४ ते ५ परप्रांतीयांनी एसी लोकलमध्ये घुसून महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवान बाबर यांना मारहाण केली आहे. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी जवान आकाश बाबर कल्याण लोकलने प्रवास करत असताना, आधीच्या स्टेशनवर त्यांची परप्रांतीय तरूणासोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर या परप्रांतीय तरुणाने आपल्या साथीदारांना फोन करत विक्रोळी स्थानकावर बोलवून घेतले होते. त्यानंतर या पारप्रांतीयाच्या जमावाने लोकलमध्ये घुसून जवान आकाश बाबर यांना मारहाण करत शिवीगाळ केली आहे.

या जवानाला जीवे मारण्याची धमकी ही मारहाण करणाऱ्या परप्रांतीयांनी दिली आहे. लोकलमध्ये हे सर्व घडत असताना गर्दी होती. मात्र जेव्हा या परप्रांतीयांनी जवानाला धमकी दिली तेव्हा, उपस्थित प्रवाशांनी दमदाटी करत त्यांना लोकलमधून हाकलले आहे. मोबाईल कॅमेरामध्ये ही घटना काही प्रवाशांनी चित्रीत करत सोशल मीडियावर तो व्हिडीओ पोस्ट केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे जवान आकाश बाबर यांनी पुढच्याच स्थानकावर उतरून रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

मुंबईतील धावत्या लोकलमध्ये परप्रांतीयांची अरेरावी रोज वाढत आहे. मराठी जवानाला झालेली मारहाण यामुळे पुन्हा एकदा सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत सर्व सामान्य नागरिका व मराठी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईत लोकल प्रवासादरम्यान घडणाऱ्या गैरप्रकारांचा मुद्दा वाढला आहे. यावर मुंबईतील रेल्वे प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही, असे काही स्थानिक प्रवाशांचे म्हणणे आहे. तर या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा