मुंबई – नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून राज्य सरकारमधील सत्ताधारी एकनाथ शिंदे-गणेश नाईक या राजकीय नेत्यामध्ये पुन्हा एकदा वाद वाढला आहे. मंत्रिपद काय चाटायचे आहे का? असे बोलत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर संताप व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून शिंदे-नाईक वाद पुन्हा पेटला आहे. वाशी येथे घेण्यात आलेल्या जनता दरबारात गणेश नाईकांनी सिडको आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना ही लक्ष केले आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन यासाठी भूखंडाची आम्ही मागणी करतोय. ते सर्व नवी मुंबईकरांचे भुखंड बिल्डरांना देण्याचे काम सिडकोने केले आहे.
मला या गोष्टीची लाज वाटते, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, त्या मंत्रिमंडळातल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचे दरिद्री काम केले आहे. माझा राग शांत करायचा असेल तर, सर्व भूखंड परत करा असा गणेश नाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. गणेश नाईक यांनी नगरविकास खाते असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर परत एकदा टीका केली आहे. मी जर नवी मुंबईकरांसाठी चांगले काम नाही केले तर, मंत्रीपद काय चाटायचे आहे का, असा प्रश्न गणेश नाईक यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील वाशी येथे घेण्यात आलेल्या जनता दरबारात गणेश नाईकांनी सिडको आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना झापले आहे.
मुंबईतील नगर विकास खात्यातील काही लोकांनी दरिद्री काम केले आहे. असे गणेश नाईक म्हणाले आहेत. मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत असा आरोप गणेश नाईक यांनी केला आहे. नवी मुंबईत हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता भुखंड मागितले पण दिले गेले नाही, नवी मुंबईतील काही दलालांनी ते परप्रांतीय बिल्डरच्या घश्यात घातले आहेत, मला या गोष्टीची लाज वाटते, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, त्या मंत्रिमंडळातील नगर विकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचे काम केले आहे, असे मंत्री गणेश नाईक म्हणाले आहेत.
राज्यातील सरकारची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून, एमआयडीसी कडून, विकासाकरिता जनतेच्या हिताकरिता जे भूखंड आहे, ते देण्याची व्यवस्था करा, असे मी राज्याच्या मंत्रीमंडळात सांगणार आहे, असे मंत्री गणेश नाईक म्हणाले आहेत. परंतु राज्यात ज्या गोष्टीसाठी मी आमदार झालो, मंत्री झालो तर त्या मुंबईतील सर्वसामान्य जनतेकरिता मी बोलू शकलो नाही, मी जर काही करू शकलो नाही, तर ते मंत्रीपद मला काय चाटायचे आहे का? असे गणेश नाईक यांनी म्हटले आहे. नवी मुंबईतील भुखंडावरून राज्य सरकारमधील सत्ताधारी एकनाथ शिंदे व गणेश नाईक या राजकीय नेत्यांच्यात वाद वाढला आहे, असे चित्र मुंबईतील वाशी येथे पाहायला मिळाले आहे.




