पंढरपूर शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात दोन आरोपींना अटक

SHARE:

पंढरपूर – शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पंढरपूर शहरात मायलेकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात तपास अधिकारी बदलले आणि पंढरपूरमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपी 1 महिन्यांत पकडले आहेत. आषाढी वारी संपल्यावर ८ महिन्यापूर्वी पंढरपूर शहरात मायलेकाची हत्या झाली होती. या तपासासाठी अनेक आंदोलने झाली होती. आता अखेर या दुहेरी हत्याकांडाचा खुलासा करण्यात आला आहे. आषाढी वारी संपल्यानंतर पंढरपूर शहरात घडलेल्या मायलेकाच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते.

या घटनेनंतर ८ महिने उलटूनही आरोपींचा तपास लागत नसल्याने पंढरपूर पोलिसांवर प्रचंड दबाव होता. तपासासाठी आंदोलने झाली, तपास अधिकारी बदलले; मात्र या दुहेरी खुनाचे आरोपी पकडले गेले नव्हते. अखेर या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे आला आणि अवघ्या एका महिन्यात या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला आहे, या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पढरपूरमध्ये ८ महिन्यांपूर्वी मायलेकाची हत्या करण्यात आली होती. पंढरपूर शहरातील लखन संजय जगताप हा तरुण आणि त्याची आई सुरेखा जगताप यांची रात्रीच्यावेळी घरात घुसून हत्या करण्यात आली होती.

आधी लखन जगतापवर १५ वार करण्यात आले. व त्याच्या आई सुरेखा जगतापवरही ९ वार करून ठार मारण्यात आले होते. पंढरपूरात हे दुहेरी हत्याकांड करून आरोपी पळून गेले होते. पंढरपूर मधील दूहेरी हत्याकांड प्रकरणात आतापर्यतच्या तपासात कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. नाहीत; तरी तपासाची नव्याने सुरुवात करण्यात आली होती. या प्रकरणात घटनास्थळी कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. कोणताही पुरावा मिळाला नव्हता. या पंढरपूर हत्याकांड प्रकरणात तपासाचे ठोस पुरावे मिळत नसल्याने पंढरपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

पंढरपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सुरुवातीपासून तपासाला नव्याने सुरुवात केली होती. या दुहेरी हत्याकांड प्रकरणात १,५०० फोन कॉल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड तपासून पाहण्यात आले आहे. याच डिजिटल तपासातून माहिती मिळत गेली. पंढरपूरातील या दूहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पंढरपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनासाठी गवत कापण्याच्या मशीनच्या पात्यांपासून हत्यार तयार करण्यात आले होते. पंढरपूर पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी आरोपींपैकी एक विशाल शिंदे नाईक याने स्वतःच पोलीस ठाण्यात फोन करून खुनाची माहिती दिली होती.

यामुळे सुरुवातीला तपास चुकीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच, पंढरपूरातील दूहेरी हत्याकांडानंतर आरोपींनी घरातील टीव्ही आणि काही साहित्य चोरून नेले होते. मात्र हा पंढरपूर हत्याकांडातील चोरीचा प्रकार नसून, पंढरपूर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम चोरीचा बनाव केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात अल्पवयीन तरूणाचा सहभाग आहे, तर या दुहेरी हत्याकांड प्रकरणात खबर्याच्या मदतीने उलगडा झाला आहे. या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलाने आरोपींना मदत केल्याचेही समोर आले आहे. खुनाच्या वेळी पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांच्या खबऱ्याने मैत्री करून त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली आहे.

यानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. आहे. पंढरपूरमधील या दुहेरी हत्याकांडात विशाल शिंदे नाईक याने अथर्व शिंदे नाईक यांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी आणि जगताप कुटुंबीय हे शेजारी राहत होते. त्यांच्यातील वैमनस्य हेच खुनामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे. या पंढरपुर हत्यांकांड प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी राजस्थानपर्यंत पोलिस गेले होते. पंढरपूरात दुहेरी हत्याकांड केल्यानंतर आरोपी राजस्थानला कामासाठी गेल्याचे तपासात माहिती मिळाली आहे. हत्येच्या वेळी विशाल शिंदेंचा मोबाईल फोन १ तास बंद होता.

फोन बंद करण्यापूर्वी त्याने सहआरोपी अथर्व शिंदेशी संपर्क साधल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती मिळाले आहेत. याच आधारावर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंढरपूरमधील चंद्रभागा नदीतून टीव्ही व हत्यार जप्त करण्यात आले आहे. पंढरपूर पेलिसांच्या अधिक चौकशीत आरोपींनी चोरी केलेला टीव्ही आणि खुनासाठी वापरलेले हत्यार चंद्रभागा नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली आहे. पंढरपूर पोलिसांनी चंद्रभागा नदीतून हे साहित्य जप्त केले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पंढरपूरातील या दुहेरी हत्याकांडामुळे गेल्या ८ महिन्यांत पंढरपूर पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

पंढरपूर पोलिसांच्या तपासाची सूत्रे अधिकारी प्रशांत डगळे यांच्या हाती आल्यानंतर, पंढरपूरचे पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी एका महिन्यात या संपूर्ण दूहेरी हत्याकांडाचा तपास करण्यात आला आहे, आणि या पंढरपूर दुहेरी हत्याकांड प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास पंढरपूर पोलिस करत आहेत

Leave a Comment

अधिक वाचा