बीड – वर्षाला दोन कोटी नौकर्यांचं आश्वासन देऊन केंद्राच्या सत्तेत आलेल्या मोदी सरकाने आपल्या जवळपास ११ वर्षाच्या काळातही देशातील बेरोजगारी कमी करण्याऐवही वाढवली आहे. असेच म्हणावे लागेल. कारण कि न सामान्य शिकलेल्या लोकांना सरकारी नौकरी मिळत आहे न उच्चशिक्षित तरूणांना. त्यामुळे मिळेल ती नौकरी करण्यास उच्चशिक्षित तरूण मजबूर आहेत. या दरम्यान राज्यातही बेरोजगारी वाढल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्हयातही तर भीषण परिस्थिती आहे. येथे केवळ १२ पास पात्रता असलेल्या पोलिस शिपाई पदासाठी उच्चशिक्षित तरूणांची अर्ज केले आहेत.
बीड जिल्हा पोलीस दलातील रिक्त १७४ पदांसाठी ११ फेब्रुवारी पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. १७४ जागांसाठी ९१३४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.अर्जाची छाननी केल्यानंतर २६५३ अर्जदार पदवीधर असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये इंजिनियर्स, एमबीए, बीएससी, बीकॉम, एमएससी, एमबीए आणि पदवीधारक आहेत. केवळ बारावी उत्तीर्ण पात्रता असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी या उमेदवारांनी अर्ज केलेत. यातून बीड जिल्हयातील भीषण बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे.
पोलिस भरतीसाठी अर्ज करणारे २६५३ अर्जदार पदवीधर असून कला शाखेचे सर्वाधिक १४२८, विज्ञान शाखेचे ५८२ आणि वाणिज्य शाखेच्या ३२१ उमेदवारांचा सहभाग आहे. तर इंजीनियरिंग क्षेत्रातील ४७ उमेदवार आणि औषधनिर्माण क्षेत्रातील १९ उमेदवार पोलीस भरतीच्या प्रक्रियेत आहेत. केवळ पदवी नाही तर उच्च शिक्षणाची सर्वोच्च पदवी घेतलेले 388 पदव्युत्तर उमेदवारही यात आहेत. १९५ एमए, ५९ एमकॉम आणि ५६ एमएससी पूर्ण केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. १९ एमबीए पदवीधर ही पोलिस शिपायाची नौकरीसाठी १६०० मीटर धावण्यास मजबूर आहेत. यातून असेच दिसून येते कि चांगली सरकारी नौकरी मिळत नसल्याने हे उच्च शिक्षित उमेदवार आता मिळेल ती नौकरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
माहित असावे कि बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. दीपक वाव्हळ असं मृत तरुणाचं नाव असून तो जिल्ह्यातील परळीचा रहिवासी होता. १६०० मीटर धावताना दीपकला भोवळ आली. अशा स्थितीत त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.




