पुणे – पुण्यातील दगडफेकीनंतर भाजपाच्या व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत, असे चित्र दिसत आहे, ध चा मा करून माझ्या वक्तव्याची फडणवीसांनी मोडतोड केली आहे. पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपा कार्यकर्त्यावर दगडफेक झाल्यानंतर आता गून्हे दाखल केले आहेत. पुण्यातील आंदोलन व दगडफेकीची घटना झाल्यामूळे काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुण्यातील दगडफेक प्रकरणात पुण्यातील काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुणे शहरातील वादानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यानंतर स्थानिक नेत्यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत काय? असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ’ध’ चा ’मा’ करून माझ्या वक्तव्याची मोडतोड देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळ संतापले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान विषयी करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर पुण्यात आंदोलन झाले. आता भाजप आणि काँग्रेसलाही भोवण्याची शक्यता आहे. या आंदोलन प्रकरणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर, दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यासह १०० जणांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर, काँग्रेसचे अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपने आंदोलन केले. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही आंदोलन केले आहे.
या आंदोलनात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवन परिसरात आंदोलन केले. भाजपच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्ते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. यावेळी भाजपकडून दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. यात काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तर पुणे महिला पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या वक्तव्यावरून हा राजकीय वाद निर्माण झाला होता.




