वर्धा – देशात प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे, भारतीय जनता पक्षाचा हा जुना अजेंडा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला आहे. त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने टीकेची झोड उठवली होती. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला त्यांच्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला वंदनीय असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला दिला आहे. भाजपला प्रश्न विचारला आहे. ते वर्धा येथे बोलत होते. भाजपला निवडणुकीत टिपू सुलतान चालतात. टिपू सुलतान यांचे छायाचित्र हे महानगर पालिका निवडणुकीत भाजपच्या घोषणापत्रात होते. सावरकरांनी शिवाजी महाराज यायला. कावळा बसायला आणी डांग तुटायला असे जे वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने सावरकरांचे पुतळे भाजप जाळणार आहे का? महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराजांबाबत विकृत बोलले. त्यामुळे त्यांचेही पुतळे आपण जाळणार आहात का? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील भाजपाच्या नेत्यांना विचारला आहे.
अमरावतीमध्ये भाजपाने एमआयएमचे मतदान घेतले. चंद्रपूर येथे एमआयएमच्या मदतीने महापौर बसवला. महाराष्ट्रात २१ ठिकाणी आपण आघाडी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी एमआयएम या पक्षाशी आघाडी युती करता, मदत करता, तुमची युती आता लपून राहिलेली नाही. असे असताना भाजपा व आरएसएस देशातील सर्व जातींच्या महापुरुषांच्या फोटोवर भाजपा जातीयवादी राजकारण करत आहे. हा त्यांचा भारतातील संविधान संपविण्याचा डाव आहे, लोकशाही अधिकार संपवण्याचा डाव आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा व आरएसएसवर केली आहे. राज्यात हिंदू-मुस्लीम तेढ वाढवण्यासाठी भाजपाकडून माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ काढून राज्यात हिंदू-मुस्लीम वाद वाढविण्यासाठी वापर केला जात आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
राज्यात मला शिवाजी महाराज भाजपा व आरएसएस कडून शिकण्याची आवश्यकता नाही. हे याठिकाणी विनम्रतेने आणी स्वाभिमानाने सांगू इच्छितो. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची व आमची शान आहेत. त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या पराक्रमामुळे स्वराज्य निर्माण झाले आहे. आणि त्या स्वराज्याची प्रेरणा देशाच्या संविधानापर्यंत आहे. काल पत्रकारांनी प्रश्न विचारला की, देशातील महामानवांचे आणि शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचे छायाचित्र कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. याकडे आपण कसे बघता त्याच्या उत्तरादाखल मी ते उत्तर दिले आहे. शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला होता, त्याचाच आदर्श हा टिपू सुलतान यांनी घेतला आहे, टिपू सुलतान हे शिवरायांचा आदर्श घेऊन इंग्रजाशी ते लढले आहेत त्या अनुषंगाने माझे वक्तव्य आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.
मला पत्रकारांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दाबून कुठेतरी हे चुकीचे वक्तव्य चालविण्यात आले आहे. हा भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे. महाराष्ट्रत जे मूलभूत मुद्दे आहे आणि दिल्ली स्तरावर ज्या फाईलमध्ये बरेच काही लपलेले आहे. त्यापासून राज्यातील लोकांचे इतरत्र लक्ष विचलित करण्याचे काम भाजपानी केले आहे. देशात प्रत्येक बाबतीत जात आणणे, देशात प्रत्येक बाबतीत धर्म आणणे, भारतीय जनता पक्षाचा हा जुना अजेंडा आहे. आणि माझ्या वक्तव्याचाही त्याच धोरणाप्रमाणे चूकीचा अर्थ लावून हिंदू-मुस्लिम वाद वाढवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. भाजपा या सगळ्या चूकीच्या गोष्टीला वाढवत आहे, आणि हिंदू-मूस्लिम नाव देत आहे.
देशातील भाजप हा माफीवीरांचा पक्ष आहे. त्यामुळेच त्यांनी माफीचा आग्रह धरला आहे. शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा अभिमान आहे. राज्यात टिपू सुलतान यांच्या अनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो भाजपने आपल्या घोषणापत्रात वापरले होते, असा आरोपही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर केला होता. आता राज्यात माझ्या वक्तव्याचा चूकीचा अर्थ लावून हिंदू-मुस्लिम वाद वाढवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर केला आहे.




