राजस्थान – अलवर मध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला आग लागून ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. राजस्थान राज्याच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला लागलेल्या आगीमूळे किमान 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अजूनही २ कामगार फटाका कारखान्यात अडकले आहेत. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा कारखान्यात २५ कामगार उपस्थित होते.
आगीची घटना कळाल्यावर शेजारील कारखान्यांमधील कामगारांनी सुरक्षिततेसाठी बाहेर धाव घेतली आहे. कारखान्याच्या मालकाने ही जागा भाड्याने दिली होती, जिथे भाडेकरू बेकायदेशीररित्या फटाके तयार करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली दारूगोळा आणि कार्डबोर्डमुळे एका भीषण स्फोटानंतर आग वेगाने पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
आसपासचे सर्व कारखाने रिकामे करण्यात आले आहेत. माहितीनुसार, या फटाका कारखान्याच्या आगीत ३ ते ४ भयानक मोठे स्फोट झाले आहेत. ज्यामुळे अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील स्थानिक नागरिक आणि फटाका कंपनी व आसपासच्या सर्व कंपनी कामगारांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील फटाका कारखान्यातील मृतांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांचा समावेश आहे. राजस्थानच्या भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील भीषण आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 8 मृतदेह सापडले आहेत. अलवार जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गस्ती पथकाला या कारखान्यातून मोठा धूर निघताना दिसला आहे. त्यानंतर अलवारमधील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
अलवारमधील अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील फटाका कारखान्याच्या आगीत मृत्युमुखी पडलेले कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अलवार व भिवाडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तरी अजूनही दोन कामगार बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
अग्निशमन दलाचे प्रभारी राजू खान यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रातील हा कारखाना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होता. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात कार्डबोर्डचा साठा करून ठेवण्यात आला होता. कारखान्यातून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने मोठे भयानक रूप धारण केले आहे. या घटनेची माहिती मिळताच भिवाडी पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले आहेत. या प्रकरणात अधिक तपास अलवार पोलिस करत आहेत.




