हार्दिकला अतिशहाणपणा नडणार, कोलंबोमध्ये गर्लफ्रेंड महिकासोबत फिरणं महागात पडणार, BCCI ॲक्शन घेणार?

SHARE:

मुंबई : भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यात काल सामना रंगला. हा सामना कोलंबोमध्ये रंगला जो भारताने जिंकला. भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना ६१ धावांनी जिंकला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकले प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या याउलट पाकिस्तानने ११४ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात एका गोष्टीने लक्ष वेधलेले दिसले.

टी-२० विश्वचषका भारतीय संघासाठी बीसीसीआयने आपल्या वादग्रस्त धोरणावर ठाम राहून भारतीय खेळाडूंच्या मागण्या नाकारल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसह जाण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

विश्वचषकादरम्यान पत्नी, गर्लफ्रेंड त्यांच्यासोबत येऊ शकतात का यावर संघ व्यवस्थापनाने स्पष्टीकरण मागितले होते. बीसीसीआयने ही मागणी स्पष्टपणे फेटाळली होती. बीसीसीआयने या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने म्हटले आहे की पत्नी किंवा गर्लफ्रेंड खेळाडूंसोबत राहू शकत नाहीत, परंतु त्यांना हवे असल्यास ते स्वतंत्र व्यवस्था करू शकतात.

बीसीसीायच्या या कठोर नियमांचे उल्लंघन हार्दिक पंड्याने केल्याचे म्हटले जात आहे. कोलंबोमधील पाकिस्तानविरुद्ध सामन्यानंतर हार्दिक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसला. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कडक मार्गदर्शक तत्वांनुसार, हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा ही टीम हॉटेलमध्ये दिसली. यानंतर आता हार्दिक पंड्यावर टीका होत आहे. हार्दिक पंड्यावर बीसीसीआयच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल टीका केली आहे. तर काहींनी नियमांचे पालन न केल्याबद्दल बोर्डावर टीका केली आहे.

हार्दिक महिका एकत्र राहत नसले आणि त्याने नियमानुसार स्वतंत्र व्यवस्था केली असली तरीही ती संघासोबत फिरतना दिसत आहे. या घटनेमुळेच हा वाद निर्माण झाल्याचा पाहायला मिळत आहे. भारतीय संघ आता भारतात नेदरलँडविरुद्ध सामना खेळेल. हा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा