अहिल्यानगर – जामखेड येथे दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे, तर याप्रकरणात पोलिसांकडून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात दूध भेसळचा प्रकरणात अहिल्यानगरमध्ये एक रॅकेट पकडण्यात आले आहे.
जामखेडमध्ये शेतकऱ्याच्या शेतातच बनावट दूध तयार करण्याचा अड्डा होता. याप्रकरणात तिघांना अटक केली आहे. राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. राज्यातील दुग्धजन्य पदार्थातील भेसळ ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. राज्यातील अन्न व औषध विभागाकडून कारवाई देखील केली जाते.
मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यात दुधात भेसळ, पनीर व इतर पदार्थांतील भेसळीचा मुद्दा पुन्हा वाढला आहे. त्यातच, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये अन्न व औषध विभागाने कडक कारवाई केली आहे. अहिल्यान्ररमध्ये दुध भेसळीचा मोठे रॅकेट पकडले आहे. याप्रकरणी, अहिल्यानगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, व दूध भेसळीचे साहित्य जप्त केले आहे. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे एका शेतकर्याच्या गोठ्यामध्ये भेसळयुक्त दूध तयार करून चांगल्या दुधात मिक्स केले जात होते. या भेसळीची माहिती मिळताच अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसांनी फकराबाद येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर धाड टाकली आहे.
दूध भेसळ करणार्या शेतकऱ्यांसह भेसळीसाठी लागणाऱ्या साहित्यासह तीन जणांना अटक केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करतात. यातून शेतकऱ्यांना चांगले पैसे देखील मिळतात. मात्र, याच व्यवसायाच्या आडून काही व्यापारी शेतकऱ्यांना हाताशी धरून भेसळयुक्त दूध तयार करतात. राज्यात भेसळयुक्त दुधापासून पैसे मिळत असले तरी या दुधामुळे सेवन करणाऱ्याचे काय हाल होऊ शकतात आणि या भेसळीमुळे मानवांवर होणाऱ्या दुष्परिणामाची गून्हेगारांना भीती वाटत नाही.
अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर केमिकलयूक्त रसायनापासून दूध तयार करण्याची प्रक्रिया केली जात होती. यात शेतकरी आणि व्यापारी यांचा सहभाग होता. ही माहिती अन्न औषध प्रशासन आणि पोलीस विभागाला मिळाली होती. पोलिसांनी गोठ्यावर धाड टाकली. यात शेतकरी रामदास उबाळे आणि समीर शेख, आफताब सेफ या दूध व्यापाऱ्यांना अटक केले आहे. त्यांच्याकडे दूध तयार करण्यासाठी असलेले 1200 लिटर लिक्विड पॅराफेन हे केमिकलयूक्त रसायन आणि आणखी काही रासायनिक पदार्थ जप्त केले आहेत.




