सलमान खानचे वडील रुग्णालयात… एक्स गर्लफ्रेंडकडून घरातील मोठं सत्य समोर

SHARE:

मनोरंजन विश्व : बॉलिवूडचे दिग्गज लेखक आणि अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सलीम खान यांच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्ती केली आहे. आता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने सलीम खान यांच्यासाठी एक पोस्ट केली आहे. सध्या सोशल मीडियावर सोमी अली हिची पोस्ट चर्चेत आहे. सोमी अली हिने खान कुटुंबियांकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल मोठा खुलासा केली आहे. शिवाय सलीम खान यांच्यासाठी चिंता देखील व्यक्त केली आहे.

सलीम खान यांच्या घरात राहत असताना मिळालेल्या वागणुकीबद्दल सोमी अली हिने सांगितलं आहे. ‘सलीम खान यांनी माझ्यावर त्यांच्या मुलीप्रमाणे प्रेम केलं… ते रुग्णालयात दाखल आहेत हे ऐकल्यानंतर मला मोठा धक्का बसला…’, शिवाय सलीम खान यांच्याकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल देखील तिने मोठं वक्तव्य केलं आहे.

सोमी अली म्हणाली, ‘संपूर्ण जगासाठी ते एक लेखक आहेत, ज्यांनी अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांना त्यांची ओळख भक्कम करण्यास मदत केली आणि शोले सिनेमांसारखे अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले… ते माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांच्या घरात राहत होती, तेव्हा त्यांनी माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं…’

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

सोमी पुढे म्हणाली, ‘जेवताना मला सोबत ठेवलं… श्रद्धेबद्दलच्या चर्चांमध्ये मला सहभागी करून घेण्यात आलं, जिथे सर्व धर्मांचा आदर आणि सन्मान केला जात असे. त्यांनी मला शिकवलं की देव हा मतांपेक्षा मोठा आहे आणि कथा सांगताना, सत्य नेहमीच नाटकामागे लपलेलं असले पाहिजे. त्यांच्या प्रतिभेने चित्रपटसृष्टीचा इतिहास घडवला. त्यांच्या मानवतेने लोकांना प्रेरणा दिली. मी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते. ते माझ्यासाठी शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे…’, असं देखील सोमी अली म्हणाली.

त्यांनी मला एक घर दिलं… ज्यासाठी मी त्यांचे आभार मानते… एवढंच नाही तर, सोमी अली हिने सलीम खान, सलमा खान आणि हेलन यांचा एक फोटो पोस्ट करत #prayingformyfather #thankyouforgivingmeahome #thankyouforallthelove #prayingforyousalimuncle असे हॅशटॅग देखील दिले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा